Mumbai News, 05 Sep : मालवणमधील (Malvan) राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी प्रमुख आरोप असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला बुधवारी पोलिसांनी त्याच्या कल्याणमधील घरातून अटक केली.
या अटकेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेत शिवभक्तांचा दबाव असल्यामुळे अखेर जयदीप आपटेला (Jaydeep Apte) त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे घडलं. ते यापूर्वी कधीच घडलं नाही. आपटेपेक्षा ज्यांनी त्याला हे काम अनुभव नसताना दिलं ते बेकायदीशीर होतं. ते सुत्रधार आजही सरकारमध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय आपटेच्या अटकेआधीच त्याच्या जामिनाची तयारी सुरु असल्याचा गंभीर आरोप देखील राऊतांनी यावेळी केला. ते म्हणाले, आपटेला अटक होण्याआधी त्याच्या जामिनाची तयारी आठ दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) कोर्टात सुरु आहे. त्या संदर्भातील सर्व सूत्र ठाण्यातून हालत आहेत. मी वारंवार ठाण्याचा उल्लेख करतोय.
तो सरेंडर होईल आणि जामिनाची तयारी करा, असे आदेश आणि कायदेशीर मदत ठाण्यातून मिळत आहे. महाराजांच्या नावाने ज्यांनी बाजार मांडला त्या षडयंत्राचे सुत्रधार ठाण्याचे आहेत, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. दरम्यान, या कामात कोण लहान आणि मोठे मासे आहेत याचा प्रश्न नाही. आम्हाला यात राजकारण करायचं नाही.
पण छत्रपतींच्या अपमानानंतर राज्यात जी स्थिती निर्माण झाली, ती लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला, कामातील भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न झाला, त्याला आमचा विरोध होता आणि त्यासाठीच आमचा लढा आहे. कोट्यवधी रुपयांचे काम टेंडरच्या मार्फत काढून पुतळ्याचं काम प्रत्यक्ष 20 ते 25 लाखात करण्यात आलं आहे. पुतळा मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम यामध्ये बरीच तफावत असल्यामुळे पुतळा कमी दर्जाचा झाल्याचंही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.