Rahul Gandhi : राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? हायकोर्टाची थेट गृह मंत्रालयाला नोटीस

Indian Citizenship Allahabad High Court Home Ministry : राहुल गांधी यांची नागरिकता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँगेसचे नेते राहुल गांधी यांच्या नागरिकतेवरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अलाहाबाद हायकोर्टाने याबाबत थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहे की नाही, याचे उत्तर गृह मंत्रालयाला देण्यास सांगण्यात आले आहे.

हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठामध्ये राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी हे यूकेचे नागरिक असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी सीबीआय चौकशी करून त्यांची भारतीय नागरिकता रद्द करण्याची मागणीही याचिकाकर्ते विग्नेश शिशिर यांनी याचिकेत केली आहे.

Rahul Gandhi
Siddaramaiah : सिध्दरामय्या यांच्याभोवतीचा फास आवळला; कोर्टाच्या आदेशाने धाबे दणाणले

या याचिकेवर बुधवारी झालेला सुनावणीनंतर कोर्टाने केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस पाठवून राहुल गांधींच्या नागरिकतेबाबत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, राहुल यांच्या नागरिकतेबाबत यापूर्वी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचवर्षी जुलै महिन्यात एक याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले होते की, ‘याचिकाकर्ते नागरिकता कायद्यानुसार सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करू शकतात.’ अलाहाबाद कोर्टात दाखल याचिकेमध्ये लोकसभा अध्यक्षांनाकडेही राहुल गांधींना संसदेच्या कामकाज सहभागी न होऊ देण्याची मागणी करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाकडून राहुल यांच्या विदेश नागरिकतेबाबत स्पष्टीकरण येईपर्यंत ही परवानगी देऊ नये, असे याचिकेत म्हटले आहे.

Rahul Gandhi
Arvind Kejriwal : हरियाणात मतदानाआधीच केजरीवालांनी गाशा गुंडाळला; जाहीर सभेत केलं मान्य...

राहुल गांधी यांच्या नागरिकतेबाबत यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यावेळी मात्र हायकोर्टाने गृह मंत्रालयाकडून खुलासा मागवला आहे. त्यामुळे गृह मंत्रालय कोर्टात काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गृह मंत्रालयाच्या उत्तरानंतर हायकोर्टाकडून याचिकेवर पुढील सुनावणी घ्यायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com