MP Naresh Mhaske appeals to the opposition to avoid politicising the NEET examination and focus on students' interests. sarkarnama
महाराष्ट्र

MP Naresh Mhask : 'नीट'सारख्या गंभीर विषयावर राजकारण टाळावे, खासदार नरेश म्हस्के यांचा विरोधकांना टोला

NEET Exam Naresh Mhaske : सरकार सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास तयार असतानाही विरोधकांकडून घोषणाबाजी आणि गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.

राहुल क्षीरसागर

Naresh Mhaske News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सातत्याने गोंधळ घालून कामकाजात अडथळे निर्माण केले जात असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित 'नीट' परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर विधायक चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. संसदेतील घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही (गुरुवारी) विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू दिले नाही. सरकार सर्व महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास तयार असतानाही विरोधकांकडून घोषणाबाजी आणि गोंधळ घालून संसदेचे कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हस्के म्हणाले.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याबाबतही खासदर नरेश म्हस्के यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारचे आंदोलन हे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाचा आणि संसदीय परंपरांचा अवमान असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला.

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या खासदारांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शने केल्याचेही त्यांनी सांगितले. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक प्रश्नावर संसदेत सखोल आणि सकारात्मक चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी विरोधकांकडून राजकीय वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, तरुणांच्या हिताशी संबंधित विषयांवर सर्व पक्षांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT