Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut News : '...मग 300 नाही तर 500 पार करुन दाखवा !' संजय राऊतांनी दिले चॅलेंज

Amol Sutar

Sanjay Raut News : 'जगात अमेरिका, चीन, रशिया यासारखे देश महाशक्ती आहेत. त्याठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर होतात. तुम्हीपण स्वत:ला महाशक्ती मानत असाल तर त्यांच्याप्रमाणे तुम्हीही देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि मग 300 नाही तर 500 पार करुन दाखवा', असे चॅलेंज खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या त्यांच्या जाहीर सभांमध्ये भाजप (BJP) लोकसभा निवडणुकीत देशात 300 जागांचा आकडा पार करेल, असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यावर शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मोदींना 'EVM है तो सबकुछ मुमकिन है' असे वाटत आहे.

त्यांचा ईव्हीएमवर (EVM) विश्वास असेल पण आमचा नाही. दिल्लीमध्ये 'इंडिया' आघाडी बैठकीत आम्ही तशी मागणी केली आहे. जरी त्यांना ईव्हीएमवरती निवडणुका घ्यायच्या असतील तर घेवू शकतात मात्र, व्हीव्हीपॅटची (VVPAT) स्लीप आमच्या हातात आली पाहिजे. आम्ही स्वत: ती पेटीत टाकणार. शंभर टक्के व्हीव्हीपॅटवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार नाही, कारण त्यात तुमची हार होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. मोदी जगात भारतही महाशक्ती झाल्याचे सांगत आहेत. जगात अमेरिका, चीन, रशियासारखे देश महाशक्ती आहेत. त्याठिकाणी निवडणुका बॅलेट पेपरवर होतात. तुम्हीपण स्वत:ला महाशक्ती मानत असाल तर त्यांच्याप्रमाणे तुम्हीही देशातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या आणि मग 300 कशाला तर 500 पार करुन दाखवा, असे चॅलेंज राऊत यांनी मोदी सरकारला दिले आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT