Lok Sabha Election 2024 : रिपोर्ट कार्ड मागितल्याने पुण्यातील BJP आमदार धास्तावले; उद्योगनगरीत नो टेन्शन

Bjp Asks Mlas Report Card For Lok Sabha Election Pune Pimpri Chinchwad : रिपोर्ट कार्ड मागितल्याने भाजप आमदारांचे धाबे दणाणले...
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 Maharashtra : लोकसभा,विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आल्याने केंद्र व राज्याच्या सत्तेतील भाजपने आपल्या आमदार, आमदार, खासदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे. यामुळे पुण्यातील पक्षाचे आमदार धास्तावले असून उद्योगनगरीत, मात्र ते नो टेन्शनमध्ये दिसून आले आहेत.

आमदार, खासदारांच्या कामगिरीचा अहवाल मागविला असल्याला भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दुजोरा दिला. प्रत्येक निवडणूक आली की ही एक नियमित प्रक्रिया असते, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यामुळे यावेळी भाजपच्या राज्यभरातील खासदार, आमदारांत चिंतेचे वातावरण आहे. कारणही त्याला तसेच आहे. अजित पवार व त्यांना पाठिंबा असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहूतांश आमदार व खासदारांचा गट हा महायुती आणि राज्य सरकारमध्ये सहभागी झाला हे ते कारण आहे.

BJP
Baramati News: मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बारामतीत ठाकरे मैदानात...

लोकसभा निवडणूक अजितदादांचा गट, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार आहे. त्यामुळे अजितदादा गटासाठी काही जागा भाजपला सोडाव्या लागणार आहेत. त्यासाठीच रिपोर्ट कार्ड हे हुकमाचे पान ते वापरणार आहेत. त्याचा आधार घेत परफॉर्मन्स चांगला नाही, असे सांगत काही खासदार, आमदारांचे तिकिट कापले जाणार असून त्या जागा नव्या भिडूला त्यांना द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे कमकुवत कामगिरी असलेल्या पक्षाच्या आमदार, खासदारांचे धाबे आताच दणाणले आहे.

लोकसभेला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिपोर्ट कार्डचे टेन्शन नाही. कारण दुर्दैवाने पुण्यातील भाजप खासदार गिरिष बापट यांचे निधन झाले आहे. तर, उद्योगनगरीत त्यांचा खासदारच नाही. मात्र, पुण्यातील त्यांचे आमदार काहीसे धास्तावले आहेत. कारण लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढायचे ठरवले, तर पुन्हा भाजपच्या काही जागांवर संक्रात येणार आहे. कारण अजित पवार गटासाठी त्या सोडाव्या लागणार आहेत. तत्पूर्वीच काही जागांवर ती क्लेम ठोकून मोकळीही झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र रिपोर्ट कार्डचे टेन्शन लोकसभेसारखे विधानसभेला तेवढे दिसत नाही. कारण येथे तीनपैकी दोन आमदार (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडच्या अश्विनी जगताप) त्यांचे असून तिसरे (पिंपरीचे अण्णा बचानसोडे) अजित पवार गटाचे आहेत. भाजपच्या दोन्ही आमदारांनी आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवलेले आहे. लांडगे यांचे नाव, तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी घेतले जात होते. तसेच अजित पवार युतीत येण्यापूर्वी शिरुरमधून त्यांचेच नाव लोकसभेला पक्षाने जवळपास फायनल केले होते. त्यामुळे २०१४ ला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या लांडगेंना रिपोर्ट कार्डची चिंता दिसत नाही.

चिंचवडमध्ये भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी, तर आमदारकीची हॅट्ट्रिक 2019 ला केली. दुर्दैवाने यावर्षी 3 जानेवारीला त्यांचे निधन झाले. पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्निनी निवडून आल्या. त्यांनी गेल्या दहा महिन्यातं आपली कामगिरी दाखवून दिली. नुकत्याच सूप वाजलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी छाप पाडली. त्यामुळे रिपोर्ट कार्ड ही त्यांच्या दृष्टीनेही चिंतेची बाब दिसत नाही. दरम्यान, हा प्रश्न महायुती विधानसभेपर्यंत टिकली तरच निर्माण होणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली असून राजकीय जाणकारांचाही तसाच अंदाज आहे.

BJP
Pune Lok Sabha Election: मोहन जोशी पुन्हा पुणे लोकसभेचे उमेदवार ? भाजपपाठोपाठ काँग्रेसकडून बॅनरबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com