Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची आज अर्थसंकल्प मांडला. तब्बल 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केल्याने या अर्थसंकल्पाचे कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात बिहारासाठी या अर्थसंकल्पातून खैरात करण्यात आली आहे.
बजेटचे कौतुक होत असताना खासदार विशाल पाटील यांनी मात्र, या बजेटवर नाराजी व्यक्ती केली आहे. ते म्हणाले, 'निर्मला सितारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावेळी केलेल्या भाषणांपैकी हे भाषण सर्वात चांगले होते. मात्र, बजेट चांगले आहे की नाही हे सर्व डिटेल्स पाहिल्यानंतरच कळेल.'
'देशात सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र देतो. तब्बल 37 ते 38 टॅक्स देशात एकटा महाराष्ट्र देतोय. मात्र, त्यामुळे महाराष्ट्राच्या बजेटकडून अपेक्षा होत्या. मात्र, महाराष्ट्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. लोकसभेला भाजपला महाराष्ट्रातून जास्ती सीट मिळाल्या नाहीत , याचा राग त्यांच्या मनात अजून असेल.', असे देखील विशाल पाटील म्हणाले.
12 लाखांच्या उत्पन्नापर्यंत टॅक्स माफीचे विशाल पाटील यांनी स्वागत केले. मात्र, जर टॅक्स माफी आहे तर मग स्लॅब कसले पाडले आहे, असे प्रश्न देखील उपस्थित केला. निर्मला सीतारामन यांना माहीत असेल की दहा वर्षांपूर्वी तीन लाखामध्ये भागायचे ते आत्ता 12 लाखांतूनही भागात नाही, असे देखील पाटील यांनी म्हटले.
बिहारची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बिहारवर योजनांचा पाऊस बजेटमध्ये पाडण्यात आला आहे. यात बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ, मखाना बोर्ड आणि पटना आयआयटीचा विस्तार या प्रमुख घोषणांचा समावेश आहे.मखानाचे (फॉक्स नट) उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि व्यापार सुधारण्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.