
Mumbai, 01 February : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता. ०१ फेब्रुवारी) २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात मोदी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी सर्वांत मोठी घोषणा केली आहे. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त करण्याचा निर्णय सीतारामण यांनी केला आहे. दुसरीकडे, शेतकरी, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. मोादी सरकारने मांडलेल्या या केंद्रीय अर्थसंकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत करताना लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. तब्बल १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरांत लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत.
एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प (Budget) सादर केल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तीनही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार आहे, त्यामुळे देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात आपला भारत देश आर्थिक सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.
तो निर्णय मैलाचा दगड ठरेल : फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इनकम टॅक्सची मर्यादा वाढविण्सांदर्भात धीराने घेतलेला हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा दावाही केला आहे. ते म्हणाले, अपेक्षापेक्षा अधिक इनकम टॅक्सची मर्यादा वाढवली आहे. बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे. नव्या कर प्रणालीचा मोठा फायदा मध्यमवर्ग, नोकरदारांना आणि नवतरुणांना होणार आहे. मोठे इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात होणार आहे, तो पैसा खर्च केल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात होणार असून त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.