MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार हे सध्या पेपरलीक प्रकरणात सुट्टीवर गेले असल्यानं त्यांच्याकडंचा प्रभारी कारभार आता आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं जोपर्यंत भीमनवार हे सुट्टीवर असतील तोपर्यंत वाघोले हेच एमपीएससीच्या अध्यक्षपदाची सुत्रं सांभाळणार आहेत.
नवे प्रभारी अध्यक्ष सतीश वाघोले हे आयोगाच्या पाच सदस्यांपैकी एक आहेत. जोपर्यंत एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आता एमपीएससीचा कारभार सांभाळणार आहेत.
दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या पेपरफुटी आणि आयोगातील कथित अनियमिततांविरोधात पुण्यात दहा दिवस धरणं आंदोलन केलं होतं. या आंदोलनात इतर मागण्यांसह आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली होती. जोपर्यंत अध्यक्ष राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतल्यानं अखेर राज्य शासनानं एक चौकशी समिती जाहीर केली. तत्पूर्वीच भीमनवार यांनी आपण चौकशी पूर्ण होईपर्यंत नैतिकतेच्या मुद्द्यावर सुट्टीवर जात असल्याचं स्वतःच ट्विटरद्वारे जाहीर केलं होतं.
चौकशी समितीत विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणं सचिव म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. पण अद्याप आपल्या जबाबदाऱ्यांबाबत अधिकृत माहिती शासनानं दिली नसल्याचं नुकतंच मुंढे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता मुढं या चौकशी प्रकरणात नेमकी काय भूमिका निभावतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.