MPSC Exam  Sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Result: MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर! आरती जाधव महिलांमध्ये पहिली, टॉपर ठरला विजय लमकाने

MPSC Result: राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्थात MPSC २०२४ चा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सोलापूरचा विजय नागनाथ लमकाने हा राज्यात पहिला आला तर आरती परमेश्वर जाधव ही महिलांमध्ये पहिली आली आहे. आयोगाकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ ची अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ते २९ मे २०२५ या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती.

उमेदवारांचा अंतिम निकाल आणि शिफारस केलेल्या ४६१ उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, नाव, प्रवर्ग, सर्व विषयांचे गुण आणि अंतिम गुण या यादीत समाविष्ट आहेत. त्याचबरोबर जे उमेदवार वैद्यकीय तपासणीसाठी अनुपस्थित राहिले होते त्यांचा या अंतिम निकालामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर हा परीक्षेचा निकाल रखडलेला असल्यानं यासंदर्भात मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. यावर १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कोर्टानं निकाल दिला. या विद्यार्थ्यांचा निकालात समावेश करण्यात आला आहे. पण प्रशासकीय कारणास्तव या उमेदवाराची शिफारस राखून ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या बाबी

या निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी या उमेदवारानं अर्ज भरतेवेळी केलेल्या दाव्यांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणीची अटींच्या आधिन राहून करण्यात आली आहे. पण जर उमेदवाराची माहिती अर्जात नमूद केलेल्या माहितीपेक्षा वेगळी आढळली तर त्याचबरोबर आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येणार आहे.

परीक्षेचा निकाल हा समांतर आरक्षणाच्या व अन्य मुदयांसंदर्भात कोर्टांमध्ये दाखल विविध खटल्यांमधील कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, मागास इत्यादीसाठी आरक्षित पदावर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस ही सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी झाल्यानंतर करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT