ST Ticket Hike: एसटीचा प्रवास महागणार! 15 एप्रिलपासून हंगामी तिकीट दरवाढ लागू; खिशावर किती ताण पडणार जाणून घ्या?

ST Ticket Hike: एसटी महामंडळानं हंगामी दरवाढ केली असून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना गावाकडं प्रवासासाठी वाढीव दरानं प्रवास करावा लागणार आहे.
S.T. Bus
S.T. BusSarkarnama
Published on
Updated on

ST Ticket Hike: दरवर्षीप्रमाणं महाराष्ट्रा राज्य परिवहन महामंडळानं अर्थात एसटी महामंडळानं तिकीटांमध्ये हंगामी दरवाढ केली आहे. येत्या १५ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळं शाळांच्या सुट्ट्यांच्या काळातच ही दरवाढ लागू होणार असल्यानं शहराकडून गावाकडं प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

किती दरवाढ?

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, यंदा महामंडळाकडून एसटीच्या तिकीटांसाठी १० ते १५ टक्के दरवाढ अपेक्षित होती. त्यानुसार अंतिमतः १० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळं आता प्रवाशांना शंभर रुपयांमागे १० रुपये अशी दरवाढ लागू असणार आहे. सुट्ट्यांच्या काळात दरवाढ हा एसटीचा उत्पन्न वाढीचा महत्वाचा स्त्रोत आहे.

S.T. Bus
Baramati ByPoll: मोठी बातमी! बारामतीत काँग्रेस उमेदवारासाठी वंचितही करणार प्रचार; 'या' अटीवर थेट प्रकाश आंबेडकरांना...

कालावधी काय?

येत्या १५ एप्रिल ते १५ जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ही १० टक्के तिकीट दरवाढ लागू असणार आहे. त्यामुळं १५ तारखेपासून प्रवास करणाऱ्या सर्वांना वाढीव तिकीटांना प्रवास करावा लागणार आहे. एसटीनं दरवाढ केल्यानं आता याचा परिणाम म्हणून खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसच्या तिकीटांतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या काळात सर्व प्रकारच्या प्रवाशी बसनं प्रवास करण्यासाठी वाढीव खर्च करावा लागू शकतो.

S.T. Bus
Nashik Crime: 'कायद्याचा बालेकिल्ला' म्हणवणाऱ्या नाशिक पोलिसांना चपराक! शहरातील मल्टिनॅशनल कंपनीत कर्मचारी महिलांचं होतंय लैंगिक शोषण

कोणत्या गाड्यांना लागू, कोणत्या नाही?

दरम्यान, दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी एसटीकडून हंगामी दरवाढ केली जाते. त्यानुसार, यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त १० टक्के तिकीट दरवाढ करण्यात आली असून ही दरवाढ साध्या आणि जलद बससाठी लागू असणार आहे. शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी आणि शयनयान बस यांना ही दरवाढ लागू असणार नाही, असंही एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com