rahul gandhi Prakash ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai BMC elections : मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत! काँग्रेस-वंचित युतीची मोठी घोषणा; 'इतक्या' जागांवर लढणार निवडणूक!

Congress Vanchit alliance News : काँग्रेस स्थापना दिनादिवशीच काँग्रेस व वंचित आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणूक आता चौरंगी होणार आहे. भाजप-शिवसेनेची महायुती, उद्धव ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंची मनसे एकत्रित लढणार तर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे तर दुसरीकडे काँग्रेस स्थापना दिनादिवशीच काँग्रेस व वंचित आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस व वंचित आघाडीची रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली. काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने या युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षात जागावाटपाबाबत फारसे मतभेद नाहीत. जागांपेक्षा आम्ही विचाराला प्राधान्य देतो असे सांगत काँग्रेस व वंचितमध्ये कुठलीच मतविभन्नता राहिलेली नसल्याने आता दोन्ही पक्षाची युतीची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला (BJP) रोखण्यासाठी काँग्रेस व वंचित आघाडी येत्या काळात एकत्रित काम करणार आहे. मुंबईमध्ये वंचित आघाडी 62 जागा लढणार आहे तर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष दहा जागांवर लढणार आहे. तर उर्वरित 150 ते 155 जागा काँग्रेस व मित्रपक्ष लढण्यावर एकमत झाले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

येत्या काळात होत असलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने समविचारी पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यात आता कसलेही मतभेद उरले नाहीत. जागावाटपात संख्याचा खेळ करण्यापेक्षा आम्ही विचाराचा मेळ घालणार असल्याचे यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रवक्ते सचिन सावंत, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT