Pune BJP News : भाजपचा पुण्यात मोठा डाव, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा मुलगाच फोडला; प्रशांत जगतापांविरोधातला 'चेहरा' ठरला?

BJP On Prashant Jagtap Politics : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये इनकमिंग सुसाट आहे. यातच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशांना आणखी वेग आला आहे.प्रशांत जगतापांच्या एन्ट्रीनं काहीसे भरात आलेल्या काँग्रेसला दुसर्‍याच दिवशी मोठा धक्का बसला.
Prashant Jagtap BJP Pune municipal election
Prashant Jagtap BJP Pune municipal election Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जगताप यांनी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ऑफर नाकारत काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या पक्षप्रवेशानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात काँग्रेसला एक आक्रमक आणि अनुभवी चेहरा मिळाल्याची चर्चा आहे. प्रशांत जगतापांनी (Prashant Jagtap) काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काही तासांतच भाजपनं त्यांच्याविरोधात लढण्यासाठीचा मोहरा हेरला आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये इनकमिंग सुसाट आहे. यातच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या पक्षप्रवेशांना आणखी वेग आला आहे. प्रशांत जगतापांच्या एन्ट्रीनं काहीसे भरात आलेल्या काँग्रेसला दुसर्‍याच दिवशी मोठा धक्का बसला.

माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी शनिवारी (ता.27) पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसशी एकनिष्ठ व पुण्याच्या राजकारणात मोठा दबदबा असणाऱ्या शिवरकर कुटुंबातीलच नेत्यानं भाजपची (BJP) वाट धरल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. माजी मंत्र्याच्या मुलानंच पक्षप्रवेश केल्यानं आता भाजपची ताकद वाढली आहे.

पुढील महिन्यांत होत असलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत नुकतेच काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांच्याविरोधात भाजप वानवडी भागातून अभिजित शिवरकरांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर पुणे महानगरपालिकेच्या हायव्होल्टेज लढतींपैकी एक जगताप विरुद्ध शिवरकर अशी एक लढत असणार आहे.

Prashant Jagtap BJP Pune municipal election
Prashant Jagtap News: काँग्रेसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रशांत जगतापांचं राष्ट्रवादी अन् शरद पवारांबाबत मोठं विधान

पुण्यात शनिवारी (ता.27 डिसेंबर) राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,शहराध्यक्ष धीरज घाटे,निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत दोन दोन मोठे भाजपप्रवेश पार पडले. यात माजी उपमहापौर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप बराटे आणि काँग्रेस नेते अभिजित शिवरकर यांचा समावेश आहे.

दिलीप बराटे यांचाही वारजे परिसरात मोठं नाव राहिलं आहे. बराटे यांनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना आपण पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. हा भाजपप्रवेश आपण माझा पुतण्या भारतभूषण बराटे यांच्यासाठी केला आहे, असंही ते म्हणाले.

Prashant Jagtap BJP Pune municipal election
Aravalli Hills Controversy : देशभरातून संतापाची उसळली लाट, अखेर मोदी सरकार नरमलं; राजस्थानातील 'अरवली' वादाबाबत घेतला मोठा निर्णय

माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी भाजपप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना पुणे शहराच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.तसेच वानवडी भागात अनेक कामे केली असून आता 14 वर्षाचा वनवास संपवून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. मी जिथं होतो तिथे एकनिष्ठ होतो, आता भाजपमध्येही एकनिष्ठच राहणार असल्याची ग्वाही या पक्षप्रवेशानंतर दिली. पण माझे वडील काँग्रेसमध्येच राहणार आहेत,असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पुण्यातील वानवडी, रामटेकडी-सय्यदनगर आणि महंमदवाडी कौसरबाग या तिन्ही प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. या तीन प्रभागांतील 11 जागांपैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या होत्या. तर भाजप 3 आणि शिवसेनेनं 2 जागांवर विजय मिळवला होता. यात प्रशांत जगताप, त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

Prashant Jagtap BJP Pune municipal election
Nawab Malik: "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा संबंध नाही" म्हणणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनं झडकारलं! मलिकांच्या कुटुंबातून ३ जणांना दिली उमेदवारी

वानवडी प्रभाग क्रमांक 25 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महापौर प्रशांत जगताप आणि त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप यांना अनुक्रमे 13 हजार 685 व 11 हजार 074 मतं मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com