Pune Crime News  Sarkarnama
महाराष्ट्र

Crime News : लोहगड प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबईत, प्रियकराने अल्पवयीन गर्लफ्रेंडला ढकलून दिलं उंच डोंगरावरून; पोलीसांकडून धक्कादायक खुलासा

Kandivali Minor Girl Murder Case : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुण्यातील सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबईत झाली आहे. येथेही अशाच पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

Mumbai Shocking Crime News : पुण्यातील सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यानंतर असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. एका प्रियकराने अल्पवयीन गर्लफ्रेंडला उंच डोंगरावरून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आली असून या हत्या प्रकरणात आरोपीला 24 तासांतच अटक केली आहे.

पुण्यातील सिया गोयल आणि केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासात दररोज धक्कादायक माहिती समोर येत असून सिया गोयल आणि तिचा प्रियकर सध्या तुरूंगाची हवा खात आहेत. तर या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला आहे. सध्या या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा आहे. अशातच अशीच धक्कादायक घटना मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरातील समतानगर येथे उघडकीस आली आहे. येथे एका प्रियकराने आपल्या अल्पवयीन गर्लफ्रेंडचा काटा उंच डोंगरावरून धक्का देत काढला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला असून पोलीसांनी आरोपीला 24 तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई तक वृत्तवाहिनीच्या वेब पोर्टलवर आलेल्या वृत्तानुसार दामूनगर परिसरातील मागील भागातील असलेल्या डोंगराळ ठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तर या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलीस, क्राइम ब्रांच आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरू करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलीस, क्राइम ब्रांचच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तापासाची चक्र गतिमान करत तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे का याचा शोध घेतला. यावेळी तरुणी हरवल्याची तक्रार दाखल झाल्याचे उघड झाले.

तपासात मृत्यू झालेल्या तरुणीचे सूरज मारुती वाघमारे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याची माहिती उघडकीस आली. यापेक्षा धक्कादायक म्हणजे सूरज वाघमारे यानेच तिला डोंगरावरून ढकलून दिलं दिल्याचेही उघड झाले. तसेच तो पेहरावावरून डिलिव्हरी बॉय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवत 24 तासांतच सूरज वाघमारे याला बेड्या ठोकल्या. दरम्यान पोलीस तपास करत असून हत्याचं नेमकं कारण अद्याप समोर आले असून ही हत्या सुनियोजित होती? की रागाच्या भरात करण्यात आली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT