Ekanth Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai MLAs Report Card : मुंबईत महायुतीची हवा टाईट! एकनाथ शिंदेंच्या आमदारांची सर्वात खराब कामगिरी; रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसचा 'डंका'

MLA Performance Report News : मुंबईत महायुतीची हवा टाईट झाल्याचे समोर आले आहे. आमदारांचे प्रगतीपुस्तक जारी केले असून विविध निकषांचे आधारे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

Sachin Waghmare

Mumbai Latest News : मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या मध्ये मुंबई शहरातील आमदारांचे रिपोर्ट कार्ड 2026 मध्ये काँग्रेसच्या तीन आमदारांनी हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 चमकदार कामगिरी केल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांची सर्वात खराब कामगिरी झाली आहे. एकंदरीतच मुंबईत महायुतीची हवा टाईट झाल्याचे समोर आले आहे. आमदारांचे प्रगतीपुस्तक जारी केले असून विविध निकषांचे आधारे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

मुंबईतील आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांनी या अहवालात अव्वल स्थान पटकावले आहे. या काळात १५ व्या विधानसभेत एकूण २,२१३ प्रश्न विचारण्यात आले. १२व्या विधानसभेतील याच कालावधीतील ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत ही संख्या ७२ टक्क्यांनी कमी झाली आहे. विधानसभेचे कामकाज पहिल्या वर्षात केवळ ४० दिवस झाले. ३३ आमदारांपैकी केवळ तीन आमदारांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले.

दुसरीकडे आमदारांचे सरासरी गुणही १२ व्या विधानसभेतील ६१ वरून १५ व्या विधानसभेत ५५ वर आले आहेत. प्रश्नांच्या गुणवत्तेची सरासरीही ५० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर घसरली आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये पहिल्या तीनही क्रमांकांवर काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली. अमीन पटेल यांनी ८२.८९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला, तर अस्लम शेख ८०.५८ गुणांसह दुसऱ्या आणि ज्योती गायकवाड ८०.३० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

या यादीत चौथ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू आणि पाचव्या क्रमांकावर ठाकरेंच्या शिवसेनेचे भायखळ्याचे आमदार मनोज जामसुतकर हे आहेत. वरळीतील आमदार आदित्य ठाकरे हे या यादीत 18 व्या स्थानी आहेत. आमदारांची सभागृहातील उपस्थिती, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, प्रश्नांचे विषय, गुन्हेगारी रेकॉर्ड अशा आधारावर ही कामगिरी ठरवण्यात आली आहे.

या रिपोर्ट कार्डमध्ये सगळ्यात खालच्या स्थानी म्हणजे 33 व्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे असून शिवसेनेचेच आमदार अशोक पाटील हे 32 व्या क्रमांकावर आहेत. तर घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम हे 31व्या क्रमांकावर आहेत. प्रजा फाउंडेशनने मुंबई शहरातील आमदारांचे प्रगतीपुस्तक जारी केले असून विविध निकषांचे आधारे आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT