Mumbai Police Viral Video: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आता आंदोलन केले जात असून मुंबईत देखील बुधवारी (ता. 22) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
यावेळी मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तसेच पुन्हा दिसलास तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमची पावडर टाकेन, सार आयुष्य वाया जाईल, अशी धमकी दिल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमुळे विरोधकांनी सरकारला घेरले असून मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात गृहखात्याने कारवाई करत धमकी देणाऱ्या पोलिसाला निलंबित केले आहे. पवन सांगळे असे या पोलिसाचे नाव असून खात्यांतर्गत त्याची चौकशी लावण्यात आली आहे.
नीट पेपरफुटीविरोधात देशात संतापाची लाट उसळली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करताना दिसत आहेत. दरम्यान, या मागणीवरून आता मुंबईतही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलने छेडली आहेत. अशातच मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ आता वादाचे कारण ठरला आहे. या व्हिडिओत काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसत आहे.
पोलीस कर्मचारी पवन सांगळे हा या विद्यार्थ्यांना पुन्हा दिसलास तर अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुमचे आयुष्य बरबाद करेन, अशी धमकी देताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी पवन सांगळे या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत नियुक्तीवरून हटवले आहे. तसेच चौकशीचे आदेश दिले आहेत.
चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि सत्यता पडताळणीचा अहवाल येईपर्यंत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या सध्याच्या नियुक्तीवरून हटवण्यात आले आहे. चौकशीअंती हा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुंबई पोलिसांनी दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या राज्यातील गृहविभागाचा कारभार हा पांडू हवालदार चालवत असल्याची खरमरीत टीका केली आहे. तर या टीकेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
तसेच या प्रकरणावरदेखील स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, एक व्हिडिओ समोर आला असून सध्या त्याची चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यानच संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.