Mumbai Police: अडीच हजारांच्या लाचेसाठी 'खाकी' कायमची गमावली : पोलीस दलातून PSI बडतर्फ

PSI Dismissed, Bribery Case, Mumbai Police: अडीच हजार रुपयांच्या लाच प्रकरणात मुंबईतील वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संगमेश्वर एकाळे दोषी ठरले. विभागीय चौकशीनंतर त्यांच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
ACB Trap
ACB TrapSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Police News: केवळ अडीच हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणे आणि ती स्वीकारण्याची तयारी दाखवणे एका पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संगमेश्वर गोपाळराव एकाळे यांना याप्रकरणी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ACB Trap
Jalna Bribe Case : अंबडच्या तहसिलदारांना अडकवणारा तक्रारदार निघाला वाळूचोर; सुयोग सोळुंकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या

काय आहे प्रकरण

वनराई पोलीस ठाण्यात एका तक्रारदाराच्या अशिलाची फसवणूक झाल्याबाबत एक तक्रार अर्ज प्रलंबित होता. या अर्जाचा तपास संगमेश्वर एकाळे यांच्याकडे होता. या तक्रार अर्जावर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यासाठी एकाळे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला पाच हजार रुपयांची लाच मागितली

'एसीबी' ची कारवाई

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एकाळे यांनी तडजोडीअंती अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी दरम्यान, लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

ACB Trap
Jalgaon Bribery Case : लाचखोर उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सोन्याची बिस्कीटे, हार, बांगड्या अन् ; कोट्यावधींचे घबाड पाहून ACB चे पथक थक्क

अखेर बडतर्फीची कारवाई

गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संगमेश्वर एकाळे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली होती. या चौकशीत एकाळे यांच्यावरील लाचखोरीचे आरोप आणि गैरवर्तन सिद्ध झाले. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणे आणि कर्तव्यात कसूर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे, या कारणास्तव एकाळे यांना पोलीस दलातून कायमचे बडतर्फ करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com