

Navi Mumbai Police News: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहे यात 10 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश देण्यातत आले आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत या बदल्या करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी याबाबत आदेश दिले आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजू होऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या फेरबदलामध्ये सानपाडा, खारघर, उरण, न्हावाशेवा, कामोठे, पनवेल शहर आणि रबाळे एमआयडीसीसह अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्तालय स्तरावरील मान्यतेनंतर हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांची खारघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांच्याकडे न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ज्योती बाळासाहेब देशमुख यांची कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी, तर बाळा रघुनाथ कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तुर्भे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू विभागात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
रबाळे एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.
न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.