BJP leaders and workers celebrate after the party’s decisive victory in 22 of 29 municipal corporations  Sarkarnama
महाराष्ट्र

Municipal Election Results : भाजपला अभूतपूर्व यश! 29 पैकी तब्बल 22 महापालिकांवर कमळ फुलले, 'या' 6 ठिकाणी विरोधकांचा झेंडा; वाचा संपूर्ण यादी!

BJP Victory Mahanagar Palika Elections Results: 29 पैकी 22 महापालिकांमध्ये भाजप सत्तेत येताना दिसून येत आहे. तर, अवघ्या सहा महापालिकांमध्ये विरोधकांना यश आले आहे.

Roshan More

BJP dominance in municipal polls: महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. तब्बल 29 पैकी 22 महापालिकांमध्ये भाजप सत्तेत येताना दिसून येत आहे. तर, अवघ्या सहा महापालिकांमध्ये विरोधकांना यश आले आहे. एका महापालिकेचे कल अजून स्पष्ट झाले नाहीत.

चंद्रपूर, मालेगाव, वसई-विरार, लातूर आणि परभणी, भिवंडी या महापालिकांमध्ये कमळ फुलू शकले नाही. येथे विरोधकांनी विजय मिळवला आहे. चंद्रपूर, लातूर आणि परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या साथीने काँग्रेस सत्तेमध्ये आली आली. अमरावती महापालिकेत भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर दिसत आहे. तेथील निकाल अजून स्पष्ट होऊ शकला नाही.

मुंबई महापालिकेत भाजप

मुंबई महापालिकेत भाजपने ठाकरे बंधूंना पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे मुंबईमध्ये भाजप प्रथम आपला महापौर बनवणार आहे. येथे भाजपला तब्बल 90 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर, शिदेंच्या शिवसेनेला 28 जागा मिळालेल्या आहेत. तर, ठाकरे बंधूंच्या युतीला 66 मिळत असून काँग्रेस 15 जागांवर आहे.

भाजपची सत्ता येणाऱ्या महापालिका

1. मुंबई

2. ठाणे

3. नवी मुंबई

4. पनवेल

5. कल्याण-डोंबिवली

6. मीरा भाईंदर

7. उल्हासनगर

8. नाशिक

9. अहिल्यानगर

10. धुळे

11. जळगाव

12. पुणे

13. पिंपरी चिंचवड़

14. सांगली

15. सोलापूर

16. कोल्हापूर

17. इचलकरंजी

18. छत्रपत संभाजी नगर

19. जालना

20. नांदेड़

21. नागपूर

22. अकोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT