

MNS leader joins BJP wins: ठाकरे बंधूंची युती झाल्यावर ज्यांनी जल्लोष केला, नाचले, पेढे वाटले आणि सकाळचा सूर्य उगवल्यावर त्यांनी थेट मनसेतून संपूर्ण कुटुंबासह भाजपत उडी मारली त्या माजी नगरसेवक दिनकर पाटलांनी महापालिका निवडणुकीत मोठा विजय संपादन केला आहे.
दिनकर पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर प्रभाग ९ मध्ये ते व त्यांचा मुलगा अमोल पाटील दोघांनाही भाजपने उमेदवारी दिली होती. दिनकर पाटील यांनी प्रभाग ९ मधील चारही जागा जिंकून आणल्या आहेत. अ,ब,क व ड चारही ठिकाणी येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग ९ मधील भाजपच्या चारही जागा निवडून आल्या आहेत. दिनकर पाटील, भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील हे चौघे निवडून आले आहेत.
या प्रभागात दिनकर पाटील यांचे पुत्र व भाजप उमेदवार अमोल पाटील आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र व शिवसेना उमेदवार प्रेम पाटील यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कारण अमोल आणि प्रेम दोघे चुलत भाऊ आहेत.
कौटुंबिक वाद असल्याने ते दोघे भाऊ एकमेकांच्या आमनेसामने उभे होते. मात्र दिनकर पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांनी आपले चुलत भाऊ प्रेम यांचा पराभव केला आहे.
दिनकर पाटील व दशरथ पाटील हे दोन सख्खे भाऊ व दोन चुलत भावांच्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईत दिनकर पाटील यांच्या फॅमिलीने बाजी मारली आहे. दिनकर पाटलांकडे प्रभाग नऊचे नेतृत्व गेले आहे.
दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपल्याला तिकीट मिळणे मुश्कील होईल हे लक्षात घेऊन दशरथ पाटील यांनी भाजपला रामराम करुन मुलासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता.
शिवसेनेने त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. प्रभाग नऊ 'ड" मधील ही निवडणूक दशरथ व दिनकर या दोन सख्या भावांबरोबरचं प्रेम व अमोल या दोन चुलत भावांच्या राजकीय कारकिर्दीसाठी महत्त्वाची होती. ज्यात दिनकर पाटलांनी गुलाल उधळला असून त्यांनी आपल्या नेतृत्वात आख्खा पॅनल निवडून आणला आहे.
विधानसभेला पराभव
दिनकर पाटील यांना विधानसभेला भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मनसेच्या तिकीटावर त्यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. पण भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अगदी ऐनवेळी त्यांनी नंतर पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली. आमदारकीला मनसेत असताना पराभूत झालेले दिनकर पाटील आता भाजपत नगरसेवक पदावर निवडून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.