Pune MVA Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : अखेर 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? काँग्रेसच मोठा भाऊ; कोणत्या पक्षाला किती जागा?

Political News : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीकडून जोरात करण्यात येत आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीकडून जोरात करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या जागावाटपात पुन्हा एकदा आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यावेळेसही जागावाटपात महायुतीला मागे टाकत महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या दोन फेऱ्या झाल्या असल्याने फॉर्म्युला जवळपास ठरला असल्याचे समजते. या जागावाटपात आघाडीच्या तीन ही घटक पक्षात एकमत झाले असल्याचे समजते. त्यामध्ये काँग्रेस (Congress) मोठा भाऊ ठरला आहे तर त्या खालोखाल शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला व राष्ट्रवादी काँग्रेसला जागा आहेत.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 105-125 जागांवर तयारी सुरु केली आहे. तर ठाकरे गटाची 95 ते 100 जागांवर लढण्याची तयारी आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 80 ते 90 जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. तर तिसरी बैठक गणेशोत्सवानंतर 20 सप्टेंबरला होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या पक्षांच्या जागांच्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यामध्ये सर्वात जास्त डोकेदुखी असलेल्या विदर्भातील 62 पैकी 29 जागांवर एकमत झाल्याने महाविकास आघाडीचं टेंशन काहीसे कमी झाले आहे. मुंबईतील 36 जागांवरूनही महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत.

मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. तर मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसचा दावा आहे. पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जागांसाठी आग्रह आहे. त्यामुळे गणेशउत्सवानंतर उर्वरित जागावाटपावर चर्चा करून सर्वच पक्षांनी फायनल करण्यावर भर आहे.

काही जागांवरून आघाडीत रस्सीखेच

येत्या आठ दिवसात महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल होण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबरला होणार असलेल्या बैठकीस तीन पक्षाकडून प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत रस्स्सीखेच असलेल्या जागांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे या बैठकीत जागावाटप फायनल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT