Girish Mahajan News : ...तर खडसेंचे स्वागत दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून करू; गिरीश महाजनांनी चिमटा काढलाच

Politcial News : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरून जोरदार चर्चा रंगली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावरुन बोचरी टीका केली.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्षांत लगीनघाई सुरु आहे. महायुती व महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यावर उमेदवारांची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. त्यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरून जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या ते भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे अजून स्पष्ट झाले नसताना मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावरुन बोचरी टीका केली.

माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या भाजपमध्ये (Bjp)आहेत की राष्ट्रवादीत हे समजत नाही. भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा लोकसभा निवडणुकीवेळी खडसे यांनी केली होती. त्यानंतर अचानक शरद पवार गटातचअसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला होता. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरीश महाजन यांनी दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू, अशी बोचरी टीका केली.

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावरुन भाजपमध्ये राजकारण रंगले आहे. त्यातच त्यांना काही नेत्याकडून विरोध केला जात असल्याचे समजते. त्यामुळेच खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजतानाच आता पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.

दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत सांगत आहेत तर मग कोणाचा विरोध राहील? खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून खडसेंचे आम्ही स्वागत करू, अशी टीकाच गिरीश महाजन यांनी केली.

Girish Mahajan, Eknath Khadse
Mahayuti Seat Allotment : महायुतीच्या तिकिटवाटपानंतर कुठलीही ब्रेकिंग मिळणार नाही; शिंदेंच्या मंत्र्याने केला दावा

जळगाव जिल्ह्यातील लिही तांडा या ठिकाणी सरपंचांच्या घरी जाताना गाडी जात नसल्याने कार्यकर्त्याच्या दुचाकीवर गेलो. काही ठिकाणी रस्ते तुंबलेले होते. त्याचे काम करून घेण्यास मी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. पण त्याचा विपर्यास केला गेला, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

पावसाळा असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून गावात कामं सुरू आहेत आणि सर्व कामे मंजूर आहेत. खोलगट भागात पाणी साचल्याने त्यातून आम्ही गाडी टाकली, एवढाच हा विषय आहे. मात्र विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केला आहे, असल्याचे महाजन यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.

Girish Mahajan, Eknath Khadse
Ambrish Ataram News : सत्ता घरी ठेवण्यासाठी आत्राम बाप-बेटीचे राजकीय डावपेच; अंबरीश आत्रामांनी केला आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com