Winter Session 2023 Sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Winter Session : मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा स्थगित, दिल्ली दरबारी सरकारचे महत्त्व कळले; दानवेंनी साधला टायमिंग

Ambadas Danve Allegation : 'केंद्राला राज्य सरकारचे असलेले महत्त्व यावरून स्पष्ट होते', असा टोला दानवे यांनी लगावला.

Pradeep Pendhare

Winter Session : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा उद्याचा दिल्ली दौरा रद्द झाला. यावर शिवसेनेचे नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टायमिंग साधत टीका केली. 'केंद्राला राज्य सरकारचे असलेले महत्त्व यावरून स्पष्ट होते', असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

अंबादास दानवे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दानवे म्हणाले, "शेतकऱ्या आत्महत्यासंदर्भात एक अहवाल पुढे आला आहे. यात एक जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि मदत देईल, असेही वाटत नाही". सरकार शेतकऱ्यांविषयी खोटारडी भूमिका घेत आहे, असेही दानवे म्हणाले.

कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री दिल्ली अमित शहा (amit shah) यांना भेटणार होते. परंतु, तेही यांना वेळ देत नाहीत. त्यामुळे दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती आहे, हे कळते, अशी देखील टीका अंबादास दानवे यांनी केली.

कांदा निर्यातबंदी, दूध दर कोसळलेत आणि इथेनॉलमुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानीदारी देखील अडचणीत आहे. आठ दिवसांपासून यावर तोडगा निघालेला नाही, हे दुर्दैव असल्याचेही अंबादास दानवे (ambadas danve) यांनी म्हटले.

आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली आहे. या मुदतीतच विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु, पुन्हा अध्यक्षांनी मुदतवाढीची विनंती न्यायालयात करणे चुकीचे आहे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT