Trible Politics : विजयकुमार गावितांच्या विधानाने विधानपरिषदेत सदस्य संतापले!

English Medium School for Trible Issue of Students Raised by Pradnya Satav : आदिवासी विकासमंत्री गोवित यांनी सदस्यांनी राजकारण करू नये, असे विधान केल्याने सदस्य संतापले.
Dr. Nilamtai Gorhe, Pradnya Satav & Dr. Vijaykumar Gavit
Dr. Nilamtai Gorhe, Pradnya Satav & Dr. Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Session 2023 : तुम्ही चौकशी करता. मात्र चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संबंधीतांशी मात्रीपूर्ण संबंध असतात. त्यामुळे चौकशीतून काहीच पुढे येत नाही, असे सांगून सभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी आज आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना सुनावले. (English Schools for trible students facing verious issues in the State)

आदिवासी (Trible) इंग्रजी शाळांच्या प्रश्नावर प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री डॉ. गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी चौकशी झाली, त्यात काहीच आढळले नसल्याचे सांगितले. त्यामुळे सभापती डॉ. गोऱ्हे (Dr. Nilamtai Gorhe) यांनीही सुचना केल्या.

Dr. Nilamtai Gorhe, Pradnya Satav & Dr. Vijaykumar Gavit
Maratha Reservation : घोषणा देत संतप्त कार्यकर्त्यांनी केला नीतेश राणेंचा निषेध

प्रज्ञा सातव यांनी आदिवासी विभागाच्या सहा इंग्रजी शाळांची अतिशय वाईट स्थिती आहे. तेथील विद्यार्थ्यांना स्वतः स्वयंपाक करावा लागतो, यांसह विविध त्रुटी असल्याचा विषय मांडला होता. त्यावर झालेल्या चर्चेत आदिवासी विकास मंत्र्यांनी याबाबत चौकशी झाली.

त्यात प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि आयुक्त अशा तीन स्तरावर तपासण्यात आले. त्यात काहीही आढळले नाही, सदस्यांची तक्रार असल्यास त्याबाबत पुन्हा चौकशी करू असे सांगितले.

याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, गोपीचंद पडळकर, आमश्या पाडवी आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले. त्यात दानवे यांनी आपण स्वतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, डहाणू, सारणे यांसह विविध शाळांना भेटी दिल्या. त्यात मुलांना स्वयंपाक करावा लागतो, असे दिसले.

स्वयंपाकी रजेवर असतो, तेव्ही अडचणी येतात. शिक्षक नसतात. एका हॉलमध्ये या विद्यार्थ्यांना रहावे लागते. अनेक अडचणी असताना मंत्र्यांना चौकशी का आढळल्या नाही, असा प्रश्न त्यांनी केली. अन्य सदस्यांनीही त्यांचे समर्थन केले.

याबाबत मंत्री गावित सातत्याने चौकशी करू, पुन्हा चौकशी करू असे उत्तर देत असल्याने सदस्यांचे समाधान होत नव्हते. त्यामुळे गावित यांनी काही शाळांची मान्यता रद्द केल्याने काही लोक यामध्ये राजकारण करीत असल्याचे विधान केले. त्यावर सदस्य चांगलेच संतापले. त्यावर गोंधळ झाल्याने सभापतींनी त्यात हस्तक्षेप केला.

Dr. Nilamtai Gorhe, Pradnya Satav & Dr. Vijaykumar Gavit
Palghar News : चक्क रुग्णवाहिकेतून दारूची वाहतूक; पालघर भरारी पथकाची कारवाई

यावेळी सभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आपण चौकशी करत असाव, मात्र ती कशी होते, हे देखील तपासले पाहिजे. या लोकांची अधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्यामुळे चौकशीत काही आढळत नसावे. काही अधिकारी चांगले असतात.

नयना गुंडे या देखील अजून आयुक्त आहेत. त्यांची मदत घ्या. विद्यार्थ्यांना अडचणी असतात, त्या चौकशीत देखील आढळले पाहिजे. त्यामुळे याबाबत गरज पडल्यास सदस्या प्रज्ञा सातव यांना बरोबर घेऊन भेट देऊन चौकशी कराव न सांगता जा, अशी सुचना केली.

Dr. Nilamtai Gorhe, Pradnya Satav & Dr. Vijaykumar Gavit
Maratha Reservation: 17 डिसेंबरपूर्वी सरकारने सांगावं, अन्यथा...; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com