Ambadas Danve : जनतेची 'किडनी' काढणारे हे सरकार, अंबादास दानवे कडाडले

Kidney trafficking : सरकार फक्त चौकशीच करते कारवाईचा मात्र विसर
Kidney Trafficking Panel
Kidney Trafficking Panelsarkarnama

Nagpur winter session : राज्यात काम करणाऱ्या सरकारला सर्वसामान्यांची काहीही काळजी राहिलेली नाही. अनेक प्रकरणात चौकशी समिती स्थापन केली जाते.त्याचे अहवाल येतात. मात्र कारवाई काहीच होत नाही. हे अनेक प्रकरणातून दिसून आले आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये घडलेल्या किडनी घोटाळा याचाच एक भाग असून त्यावर राज्य सरकारकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते अंबादार दानवे हे सरकारवर कडाडले.

Kidney Trafficking Panel
Babanrao Lonikar Rajesh Tope audio clip : एका आमदाराची दुसऱ्या आमदाराला शिवीगाळ

हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे आहे. समित्या, चौकशी केली जाते. मात्र त्यातून ठोस कारवाई होत नाही. हे जनतेची किडनी काढणारे सरकार असल्याची जहरी टीका अंबादास दानवेंनी केली. दीड वर्षापूर्वी पुण्यातील रूबी हॉल येथे किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून सारिका सुतार या महिलेवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेला ठरविण्यात आलेले पैसे देण्यात आले नाही. त्यानंतर या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन रूबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ परवेझ ग्रँट यांच्यासह तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची जोरदार चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली होती.या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे दिला आहे. मात्र अद्यापही त्यावर काहीही कार्यवाही न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर येथे सध्या राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन ज्या भागात सुरू आहे, या विधानभवन परिसरात ' मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री पुण्याच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लक्ष देणार का? पुण्यातील किडनी तस्करी करणाऱ्या रुबी हॉल वर काय कारवाई केली, हे महाराष्ट्राला समजेल का? असे मजकूर लिहिलेले हे बॅनर्स आहेत.याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले असता, हे जनतेची किडनी काढणारे सरकार असल्याची जहरी टीका त्यांनी केली.

(Edited by Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com