Nana Patole sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : नाना पटोलेंचा निकालाआधीच मोठा दावा; मुख्यमंत्रिपदाबाबत केलं आहे विधान, म्हणाले...

Nana Patole claim on Maharashtra CM position: उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यावरही दिली आहे प्रतिक्रिया

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Vidhansabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल पार पडली. यानंतर कालपासूनच एक्झिट पोल समोर येत आहेत, ज्यातील बहुतांश एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचं दिसत आहे. परंतु आता सर्वांचे लक्ष 23 तारखेच्या निकालाकडे लागले आहे.

मात्र तत्पुर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आम्हीच सत्तेवर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचंही एक मोठं विधान समोर आलं आहे.

निवडणूक निकालाबाबत नाना पटोलेंनी म्हटले की, ''जो काही निकाल असेल. जो मतदानानंतर कार्यकर्त्यांना विचारलं तर हे स्पष्ट झालं की, महाविकास आघाडीचं (MVA) सरकार येणार आहे. हरियणात जे नुकसान झालं आहे, ते महाराष्ट्रात होवू नये यासाठी मतमोजणीच्यावेळी प्रत्येक बुथवर आमचे लक्ष असणार आहे. मतमोजणीस जाणाऱ्या प्रतिनिधींन आम्ही सूचना करू आणि कुठेही काही गडबड होवू नये, यावर आमचे लक्ष असेल. कुणालाही कुठे घेवून जाणार नाही आहोत. सर्वांना मुंबईतच ठेवणार आहोत आणि आम्ही निकालानंतर सरकार बनवण्याचा दावा करू.''

याशिवाय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विजयाच्या दाव्यावर त्यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीसांना हवेत राहू द्या. तरूण आणि महिलांची वाढलेली मतं आम्हाला मिळाली आहेत. लाडकी बहीण देखील महागाईमुळे त्रस्त आहे.

मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले? -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात जर महाविकास आघाडीचे सरकार बनले तर मुख्यमंत्री कोण असणार? या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, आज यावर काही नाही बोलणार. जर सरकार बनले तर नक्कीच तिन्ही पक्ष एकत्रित असतील. या आधी नाना पटोलेंनी म्हटलं होतं की, जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल.

यावेळी भाजपवर निशाणा साधताना नाना पटोलेंनी म्हटले की, भाजप दारू आणि पैशांच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ते प्रत्येक गोष्टीला जिहाद म्हणतात, तर मग हा देखील नोट जिहार आणि वोट जिहाद होता. त्यांचे विनोद तावडे आणि वानखेडे नोट जिहार आणि वोट जिहादच करत होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT