Assembly Election : निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर, विनय कोरेंच्या कार्यकर्त्यांना 'काॅन्फिडन्स'

Assembly Election Shahuwadi Constituency Vinay Kore : 2014 साली माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे विजयी झाले होते. तर, 2019 ला आमदार विनय कोरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला होता.
Assembly Election
Assembly Electionsarkarnama
Published on
Updated on

Assembly Election News : पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील अटीतटीची लढत झाली. महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि महायुतीकडून जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे हे निवडणुकीला सामोरे गेले. दोघेही तुल्यबळ असल्याने निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

दरम्यान बुधवारी मतदान पार पडल्यानंतर मतदारसंघात दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आमदार विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांनी निकाला आधीच पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात विजयाचे बॅनर झळकवले आहेत.कोरे यांच्या विजयाचे बॅनरमध्ये मंत्रिपदसुद्ध मिळणार, असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी फलकावर केला आहे.

Assembly Election
Sharad Pawar : 'वस्ताद'च ते ! वय 84; 64 दिवसांत 43 कार्यक्रम, 13 पत्रकार परिषदा अन् राज्यात 60 जाहीर सभा..!

पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाची परंपरा ही नेहमीच चर्चेत राहिली आहे. या मतदारसंघात 1999 पासून सलग आमदार होण्याची संधी कुणालाच मिळाली नाही. दर पाच वर्षाला या मतदारसंघातून आमदार बदलला आहे. 2014 साली माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे निसटत्या मताने जिंकून आले होते. केवळ 200 ते 300 मतांचा फरक होता. तर 2019 ला आमदार विनय कोरे यांनी सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला होता.

यंदाही दोघांमध्ये खरी लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत सरूडकर हे उमेदवार असल्याने ते घरोघरी पोहोचले आहेत. सहा महिन्यातच निवडणूक लागण्याने महाविकास आघाडी कडून ते उमेदवार आहेत. शिवाय कोरे यांची देखील या मतदारसंघावर पकड आहे. त्यातच कोण बाजी मारण्यात याकडे लक्ष लागून राहिले असून येत्या 23 तारखेलाच निकाल समोर येणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान

राज्यात सर्वाधिक मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान झाले. मतदारसंघातील प्रत्येक लढत अटीतटीची आणि काटाजोड लढत झाल्याने मतदारांसह सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Assembly Election
Pune Assembly Election : कांदा, लाडक्या बहिणी कोणाला हसविणार? पुणे जिल्ह्यात चुरस, उत्कंठा शिगेला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com