Eknath Shinde, Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole On Dombivli Blast : डोंबिवलीतील कंपन्यांकडून मुख्यमंत्र्यांनी पैसे घेतले..; नाना पटोलेंच्या आरोपानं खळबळ

Dombivli MIDC blast : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डोंबिवलीतील कंपनी कशी सुरू ठेवण्यात आली, याबाबत मोठा आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले. स्फोटाच्या घटनेवर संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

Pradeep Pendhare

Dombivli MIDC News : डेंबिवलीमधील केमिकल कंपनीतील स्फोटावरून (Dombivli MIDC blast) आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मत्रिमंडळावर याबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला. नाना पटोलेंच्या (Nana Patole) या गंभीर आरोपामुळे राज्याच्या राजकारण आणखी तापणार आणि ते ढवळून निघणार, असे दिसते.

ठाणे येथील डोंबिवलच्या (Dombivli) केमिकल कंपनीमध्ये काल मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे डोंबिवली हादरली होती. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा अधिक होरपळून जखमी झाले. या कंपनीतील बॉयलरमध्ये एका पाठोपाठ तीन स्फोट झाले. स्फोट एवढा मोठा होता की, चार किलोमीटरपर्यंत आवाज गेला. दीड ते दोन किलोमीटरच्या इमारतीच्या काचा फुटला. या कंपनीतील बॉयलरला परवानगी नसल्याची माहिती कामगार विभागातून समोर आली. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मदतकार्याचा आढावा घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी डोंबिवलीमधील ही कंपनी कशी सुरू ठेवण्यात आली, याबाबत मोठा आरोप करत राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरले आहे. या घटनेची जबाबदारी घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने डोंबिवलीमधील केमिकल कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी देखील माहिती नाना पटोले यांनी दिली. Nana Patole has seriously accused the Chief Minister of the state and the government on the Dombivli blast case

"महाराष्ट्रात खोक्यांचे सरकार आले. त्या उद्योगपतींकडून पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले गेले. कालच्या स्फोटात निष्पाप लोकांचे जीव गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने पैसे घेऊन उद्योग सुरू ठेवले. केवळ एकटे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्यापेक्षा, संपूर्ण सरकारनेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे. जनता यांना आता खेचून मारेल. सत्तेतून बाहेर काढले", अशी तिखट प्रतिक्रिया नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. नाना पटोले यांच्या या गंभीर आरोपामुळे राज्य सरकार घेरले गेले आहे. सरकारकडून नाना पटोले यांच्या आरोपावर प्रतिक्रिया आलेली नाही. सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT