Gajanan Kirtikar News : दरेकरांनी कीर्तिकरांवर केलेल्या आरोपातील संजय शिरसाटांनी हवाच काढली !

Political News : शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार तथा त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना जिंकून आणायचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता.
Gajanan Kirtikar, pravin darekar, Sanjay shirsat
Gajanan Kirtikar, pravin darekar, Sanjay shirsat Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक आरोपाची एकही संधी सोडत नसल्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यातच आता गेल्या दोन दिवसापासून उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर व त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर या पिता-पुत्रावरून शिवसेना शिंदे गटातून टीका-टिप्पणी केली जात आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी गजानन कीर्तिकर (Gajnan Kirtikar) यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर (Amol kirtikar ) उमेदवार होते. त्यावरून अनेकांनी खासदार कीर्तिकर यांना लक्ष्य केले आहे. निवडणुकीवेळी खासदार कीर्तिकर व त्यांच्या पत्नींनी मुलाची बाजू घेतल्याचे जाणवले. त्यामुळे शिवसेना नेते शिशिर शिंदेनी आरोप केले होते. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना भाजप (Bjp) नेते प्रवीण दरेकर यांनी थेट खासदार कीर्तिकर यांच्यावर आरोप केले. (Gajnan Kirtikar news)

Gajanan Kirtikar, pravin darekar, Sanjay shirsat
Prashant Kishor: चार जूनला पाणी सोबत ठेवा; प्रशांत किशोरांचे टीकाकारांना उत्तर; भाजपच्या मतांची टक्केवारी...

कीर्तिकर यांचा मुंबई वायव्य मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न होता. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अंतिम क्षणी उमेदवारी मागे घेऊन ठाकरे गटाचे उमेदवार तथा त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना जिंकून आणायचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपाबाबत शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांना सवाल केला असता ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे गजानन कीर्तिकर यांनी उमेदवारी मागितली नव्हती. मुळात त्यांनी ही निवडणूक लढवावी असाच आमचा आग्रह होता. परंतू त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. यानंतर रवींद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर केली. तरीही यामध्ये काही शंका असेल तर त्यासंदर्भात गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत होणाऱ्या चर्चेतून काही निष्पन्न होईल, असे शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट

गजानन कीर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज उद्या भेट होणार असल्याची माहिती देखील संजय शिरसाट यांनी दिली. त्या दोघातील भेटीनंतर यावर अधिक बोलता येईल असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

Gajanan Kirtikar, pravin darekar, Sanjay shirsat
Gajanan Kirtikar Special Analysis: गजानन कीर्तिकरांवर काय होऊ शकते कारवाई?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com