Mumbai News : राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला तीन मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसेनेमुळे महायुतीच्या हातातील पदवीधरच्या तीन जागा गेल्या असा आरोप भाजप नेत्याकडून केला जात आहे. या पराभवाचे खापर भाजपने थेट एकनाथ शिंदे यांच्या फोडल्याने शिवसेनेत नाराजी आहे. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर याचा इफेक्ट जाणवू लागला आहे. नंदुरबारमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेला दूर ठेवत 'स्थानिक' च्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय भाजपने घेतला आहे. माजी खासदार हिना गावित यांच्या आदेशानंतर कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
भाजपने (BJP) आता आगामी काळात होत असलेल्या नंदुरबारमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. माजी खासदार हिना गावित त्याबाबत प्लॅनिंग करीत आहेत. राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे. परंतु याबाबत काही वेगळ्या निर्णय घेण्याची वेळ आली तर पक्षश्रेष्ठी त्याबाबत निर्णय घेतील, असे हिना गावित यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकालानंतर शिवसेना नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्याचा परिणाम आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दिसू लागला आहे. नंदुरबारमध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी थेट एकला चलो रे चा नारा दिला आहे. दरम्यान स्वबळावर निवडणुका लढायच्या आहेत की युतीत याचा निर्णय हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणूक निकालावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर महायुतीत वादाचे तडे पडल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम येत्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत पडणार असल्याच चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.