

Mumbai News : सुप्रीम कोर्टात गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या शिवसेना पक्ष व चिन्हावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 30 ऑक्टोबरपूर्वी शिवसेना पक्ष व चिन्हावर निर्णय होईल, अशी अपेक्ष व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दहा दिवसात या प्रकरणी सुनावणी झाली नाही. 14 ऑक्टोबर 2026 रोजी सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या पीठासमोर ही केस सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली होती. मात्र, त्या दिवशी ही सुनावणी झाली नाही. आता संगणकीय प्रणालीनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 नोव्हेंबर 2026 रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना (Shivsena) पक्ष व चिन्हावर गेल्या दोन महिन्यापासून सुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असून बंडखोर आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य असल्याने सर्वोच्च न्यायालयानेच शिंदे गटाच्या आमदारांना थेट अपात्र ठरवून 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवावे, असा युक्तिवाद करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नीरज कौल यांनी बाजू मांडताना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्याकडून असा युक्तिवाद करण्यात आला की, हा पक्षांतराचा विषय नसून पक्षांतर्गत लोकशाही आणि बहुमताचा अधिकार आहे, तसेच आमदारांनी मूळ पक्ष सोडलेला नसून केवळ नेतृत्वावर अविश्वास दाखवून नवीन गटनेता निवडला आहे; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने थेट अपात्रतेचा निर्णय न देता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आणि मूळ कार्यपद्धतीचा आदर केला पाहिजे, असे मत मांडले आहे.
जून 2022 मध्ये शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर घडलेल्या राजकीय नाट्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी शिवसेना मानत त्यांच्या आमदारांवरील अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. अध्यक्षांच्या या निर्णयाला ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे (SLP) आव्हान दिले आहे.
23 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता
या सर्व प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. 30 ऑक्टोबरपूर्वी शिवसेना पक्ष व चिन्हावर निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दहा दिवसात या प्रकरणी सुनावणी झाली नाही. आता संगणकीय प्रणालीनुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 नोव्हेंबर 2026 रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.