महाराष्ट्र

Nasarapur case latest update : नसरापूर प्रकरणात मातब्बर वकिलाची एन्ट्री चिमुकलीला न्याय मिळणार!

Nasarapur case latest update : नसरापूर प्रकरणात आता मातब्बर वकिलाची एन्ट्री झाल्याने चिमुकलीला न्याय मिळण्याची आशा वाढली आहे. तपास, घडामोडी आणि जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घ्या.

Rashmi Mane

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात नाशिकचे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यपालांच्या स्वाक्षरीने याबाबतचा अधिकृत अध्यादेश जारी झाला आहे.

या प्रकरणात वकील म्हणून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती. स्वतः शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर चर्चा केली होती. पण पुणे पोलिसांच्या शिफारशीनुसार, अ‍ॅड. मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे.

मिसार हे २०१६ पासून नाशिकचे जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई साखळी बॉम्बस्फोट, मालेगाव बॉम्बस्फोट आणि अबू जिंदाल, हिमायत बेग यांसारख्या दहशतवाद्यांविरुद्धचे खटले प्रभावीपणे चालवले आहेत. कुख्यात गुंड रवी पुजारी आणि इक्बाल कासकर यांच्याविरोधातील खटल्यांचे कामकाजही ते पाहत आहेत.

नाशिकच्या गाजलेल्या सातोटे खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा मिळवून दिली. याशिवाय नाशिक धान्य घोटाळा, बदलापूर अत्याचार प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरणातही ते विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी मिसार यांनी अन्य खटल्यांमधील व्यस्ततेचे कारण देत अशोक खरात खटला लढण्यास नकार दिला होता.

जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालय -

नसरापूर प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी राज्य सरकारने विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा स्वतंत्र अध्यादेशही काढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT