Tamil Nadu Breaking news : विजय यांचा शपथविधी होणारच; चार पक्षांच्या पाठिंब्यावर गाठला बहुमताचा आकडा

Vijay TVK majority, Tamil Nadu government formation : विजय यांनी राज्यपालांची दोनदा भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. पण राज्यपालांनी ११८ आमदारांची यादी सादर करण्यास सांगितले होते.
Vijay is expected to meet Governor Rajendra Arlekar to stake claim for government formation in Tamil Nadu after reported backing from CPI, CPI(M) and VCK. (AI Image)
Vijay is expected to meet Governor Rajendra Arlekar to stake claim for government formation in Tamil Nadu after reported backing from CPI, CPI(M) and VCK. (AI Image)एोीकोीलोसो
Published on
Updated on

Vijay CM claim : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ आमदारांची जुळवाजुळव केल्याचे वृत्त आहे. सुरूवातीला काँग्रेस आणि आता भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि व्हीसीके या पक्षांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

निवडणुकीत विजय यांच्या पक्षाचे १०८ आमदार निवडून आले आहे. विजय हे दोन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याने त्यांचे एक मत ग्राह्य धरले जाणार नाही. त्यांच्या पक्षाचे १०७ आमदार होतात. त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११८ जागांची गरज आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता. मागील दोन दिवसांपासून उरलेल्या तीन पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती.

विजय यांनी राज्यपालांची दोनदा भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. पण राज्यपालांनी ११८ आमदारांची यादी सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे डाव्या पक्षांसह व्हीसीके पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर आज दोन्ही डाव्या पक्षांसह व्हीसीकेने विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे संख्याबळ ११८ वर पोहोचले आहे.

Vijay is expected to meet Governor Rajendra Arlekar to stake claim for government formation in Tamil Nadu after reported backing from CPI, CPI(M) and VCK. (AI Image)
Tamil Nadu BJP news : तमिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याआधीच भाजपची मोठी घोषणा; विजय यांना दिलासा मिळणार?

बहुमताचा आकडा जुळल्याने आता पुढील काही वेळात विजय हे राज्यपालांची भेट घेऊन ११८ आमदारांची यादी त्यांच्यासमोर सादर करतील. त्यानंतर राज्यपालांकडून त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल. विजय यांचा शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासूनच शपथविधीची तयारी सुरू आहे. पण राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने शपथविधी रखडला होता.

Vijay is expected to meet Governor Rajendra Arlekar to stake claim for government formation in Tamil Nadu after reported backing from CPI, CPI(M) and VCK. (AI Image)
Governor Rajendra Arlekar : तमिळनाडूत 'DMK-AIADMK'ची सत्ता? राज्यपालांनी सर्व चर्चांवर थेट उत्तर देत वाढविली धाकधूक...

कोणत्या पक्षाचे किती आमदार?

टीव्हीके - १०८-१ = १०७

काँग्रेस - ५

सीपीआय - २

सीपीआय (एम) - २

व्हीसीके - २

एकूण - ११८

बहुमताचा आकडा - ११८

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com