Rupali Chakankar SIT summons Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar SIT summons : पुरावे नष्ट होण्याआधीच अटक करा! रोहिणी खडसेंचा थेट इशारा; चाकणकरांच्या अडचणीत भर

SIT issues summons to former Women Commission chief Rupali Chakankar in Nashik Ashok Kharat case; Rohini Khadse demands immediate arrest over alleged atrocities against women : नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची चौकशीसाठी समन्स बजावण्यावरून रोहिणी खडसे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Nashik Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात पहिली राजकीय विकेट गेली ती, रूपाली चाकणकर यांची! महिलांच विकृतपद्धतीने शोषण करणाऱ्या अशोक खरातभोवती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या, विशेष तपास पथकानं तपासाचा सापळा अवळला आहे.

यातूनच महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी याबाबत मोठी मागणी केली आहे.

शरद पवार राष्ट्रवादीच्या (NCP) रोहिणी खडसे यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर केली आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात 'कांड'मध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांना एसआयटीचे समन्स आले असल्याचे कळत आहे. याकडे खडसे यांनी लक्ष वेधलं.

रोहिणी खडसे म्हणाले, "अशोक खरात कांड हा खूप मोठा आणि खोल विषय आहे. एकाप्रकारे हे एक रॅकेटच आहे. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी समन्स न बजावता थेट अटक कारवाई प्रशासनाने करायला हवी. आरोपींना पुरावे नष्ट करण्याची कोणतीही संधी मिळू नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी."

नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातचा कारभार उघडकीस आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, रूपाली चाकणकर आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते, संघटक विलास लवांडे यांनी चाकणकर आणि तटकरेंना आरोपी करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना शरद पवार पक्षाचे निवेदन

विलास लवांडे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष तटकरे आणि चाकणकर यांच्यामुळे बदनाम झाला आहे. अजितदादांनी कदाचित हे सहन केलं नसतं. अशोक खरातला त्यांनी राजकीय आधार देऊन पाठबळ दिलेले होते. त्यांना आपण अभय देऊ नये, असे लवांडे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सहआरोपी करून अटक करा

अशोक खरात याने जे विविध गुन्हे केलेले आहेत, ते गंभीर स्वरूपाचे असून ते एकट्याने केलेले नाहीत. त्याची मोठी टीम त्याच्यासोबत होती. श्री शिवनिका संस्थानच्या तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या विश्वस्त सदस्य होत्या. सुनील तटकरे रूपाली चाकणकर तसेच इतर सर्व विश्वस्त यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेळोवेळी, अशोक खरातला मदत केल्याच्या कारणास्तव त्यांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. त्यांना अटक करावी, असेही लवांडे यांनी निवेदनात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT