Sunil Tatkare And Rupali Chakankar : “तटकरेंना आरोपी करा!” राष्ट्रवादी आक्रमक, जयंत पाटलांचा फोटो पुढे करत पलटवार, ‘स्क्रिप्ट’वरून खळबळ

Ajit Pawar faction leader Anand Paranjpe responds to Sharad Pawar NCP demand to name Sunil Tatkare and Rupali Chakankar as co-accused in the Nashik Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपीची भाषा करणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादीला अजित पवार राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
Sunil Tatkare And Rupali Chakankar
Sunil Tatkare And Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP : अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांना भोंदूबाबा अशोक खरात तात्काळ सह आरोपी केले पाहिजे. त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून त्याची मोठी टीम होती.

म्हणूनच आजपर्यंत त्याचे अनेक कारनामे दडपलेले होते, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ता विकास लवांडे यांनी करताच, अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जयंत पाटील यांचे देखील भोंदूबाबा अशोक खरात याच्याबरोबर फोटो आहेत, त्यांना देखील आरोपी करायचे का? विकास लवांडे हे रोहित पवार यांची स्क्रिप्ट वाचत असल्याचाही टोला परांजपे यांनी लगावला.

नाशिकमधील (Nashik) विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचे महिला लैंगिक शोषणाचे प्रकरण समोर आल्यानंतर, अन् त्याच्या राजकीय संपर्कावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात राजकीय घटनेची पहिली विकेट पडली असेल तर ती, अजित पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची!

अशोक खरात याच्याशी असलेल्या अध्यात्मिक संबंधांमुळे, त्याला दिलेल्या राजकीय संरक्षणाच्या आरोपावरून रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना त्यांच्या दोन्ही पदाचा राजीनामा द्यावा लागला. यातच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे चाकणकर यांना वाचवण्यासाठी बराच प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या प्रकरणावरून शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादीमध्ये जुंपली आहे.

Sunil Tatkare And Rupali Chakankar
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

तटकरे आणि चाकणकर यांच्या बोटांना झालेल्या जखमांवरून वाद काढून, आघोरी प्रकार आहे का? खरातचा याच्याशी काही संबंध आहे का? असे आरोप करत शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आरोपांची धार वाढवत, चौकशीची मागणी केली आहे. आता तर, तटकरे आणि चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

Sunil Tatkare And Rupali Chakankar
Shripad Chindam : हकालपट्टी की राजकारण? छिंदमचा आरोप; “माझ्या जीवाला धोका, आमदार जबाबदार!”

रोहित पवारांची स्क्रिप्ट का?

अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन, लवांडे यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तटकरे यांना सहआरोपी करा, अशा मागणीमागे त्यांच्या पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या सांगण्यावरून ते आरोप केला नाही ना? असे परांजपे यांनी म्हटलं.

जयंत पाटलांना आरोपी करायचं का?

'जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिले गेले? जलसंपदा मंत्री कोण होतं? कोण मुख्यमंत्री होतं? जयंत पाटलांचे अनेक फोटो आणि भेटी त्यावेळी भोंदूबाबा खरातबरोबर झाल्या आहेत. मग त्यांनाही सहआरोपी करण्यात यावं, अशा प्रकारची मनश्या तुमचे युवा नेते आमदार रोहित पवार यांची तर नाही ना? त्यांची वाक्य आपण बोलत होता का? अशी भावना मनात येते,' असे आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.

विकास लवांडेंची नेमकी मागणी काय?

माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून अशोक खरात याने सुनील तटकरे यांना फोन केले होते. माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे अनेक वर्षे आमदार आहेत, त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती समोर आणली पाहिजे. सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांना तात्काळ सह आरोपी केले पाहिजे. त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून त्याची मोठी टीम होती म्हणूनच आज पर्यंत त्याचे अनेक कारनामे दडपलेले होते.

भोंदूगिरीमध्ये सत्ताधारीच अडकलेले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे फोटो अशोक खरात आणि ऋषिकेश वैद्य, अशा भोंदू व बलात्कारी बाबांच्या सोबत आहेत. इतर अनेकजण सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते अडकलेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय ठरवेल कोणत्या गुन्ह्यांमध्ये कोणाला आरोपी करायचं की नाही करायचं, असे विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com