Girish Mahajan News : इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका आता उडाला आहे. हे युद्ध अधिक ताणले जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आखातात अनेक भारतीय अडकून पडले आहेत. इराण युद्धावर आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केंद्र शासनाने या प्रश्नावर योग्य भूमिका घेण्याची गरज असल्याचे खासदार राऊत म्हणाले होते.
त्याला भाजप नेते गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. खरे तर संजय राऊत यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. राऊत यांनी केलेले विधान योग्य नाही. कदाचित ते आखातात जाऊन युद्धातही सहभागी होऊ शकतात, असा टोमणा महाजन यांनी लगावला. भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन महाजनांनी दिले असून शेतकऱ्यांवरील परिणामाबाबत सरकार गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेले युद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना घडामोडींचा भाग आहे. या संदर्भात सगळ्यांनीच संयमाने वागले आणि बोलले पाहिजे. ही स्थिती कोणावर टीका करण्याची नाही. संयमाने परिस्थितीचे अवलोकन करण्याचे आहे, असे ते म्हणाले.
जग अतिशय वेगाने तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करीत आहे. तसे झाल्यास त्याचा मोठा फटका सबंध जगाला बसणारा. भारतीय पासून अलिप्त आणि सुरक्षित आहे. अशा स्थितीत बालिश विधाने करणे टाळले पाहिजे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचा मोठा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष आणि अन्य निर्यातीवर झालेला आहे. नाशिकचे द्राक्ष आणि कांदा आखातातील देशांना आणि दुबईला जातो. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.
सध्या कांद्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. सरकारला त्याची जाणीव आहे. यासंदर्भात शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलन आणि त्यांच्या मागण्या राष्ट्र वाटतात. याबाबत लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.