Navneet Rana, Imtiaz Jaleel Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel : "...तर मी अमरावतीतून निवडणूक लढण्यास तयार," जलीलांचं राणांना प्रत्युत्तर

Imtiaz Jaleel On Nitesh Rane : इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांचाही समाचार घेतला आहे.

Akshay Sabale

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel ) यांच्यात तू-तू-मैं-मैं सुरू आहे. "जलील यांच्यात दम असेल, तर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि माझा पराभव करून दाखवावा," असं आव्हान राणा यांनी जलील यांना दिलं होतं. याला आता इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( Imtiaz Jaleel Latest News )

नवनीत राण काय म्हणाल्या होत्या?

"इम्तियाज जलील यांच्यात दम असेल, तर त्यांनी अमरावतीत येऊन निवडणूक लढवावीआणि माझा पराभव करून दाखवावा. मीही पाहते जलील संभाजीनगरमध्ये कसे निवडून येतात. इम्तियाज जलील ओवैसीचे चमचे आहेत. या देशात राहायचं असेल, तर जय श्री राम म्हणावंच लागले," असा इशारा नवनीत राणांनी दिला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर इम्तियाज जलील म्हणाले, "नवनीत राणांनी मला बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावं. ज्या प्रमाणे तुम्ही बोगस जात प्रमाणपत्र मिळवलं. त्यावर पाच वर्षे सत्तेचा मजा लुटली. हे मी नाहीतर उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. मी अमरावतीतून लढण्यास तयार आहे. सुरूवात तुम्ही केली होती, शेवट आम्ही करणार आहे."

"भाजपाच एक नेता टिंगू आहे. त्यांना बाजूला उभे केले, तर माझ्या पायमज्याची उंची सुद्धा जास्त असेल," अशी टीका जलील यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर केली आहे.

"महापालिका निवडणुकीवेळी शरद पवार आले आणि मी अपघतानं निवडून आल्याचं सांगितलं. पण, मी म्हटलं जिथे-जिथे निवडणुका होतील, तिथे-तिथे असे अपघात होत राहतील," असा हल्लाबोल जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT