Uddhav Thackeray, Shrikant Shinde
Uddhav Thackeray, Shrikant ShindeSarkarnama

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंनी हेलिकॉप्टर प्रवासावरुन उद्धव ठाकरेना डिवचलं; म्हणाले, 'आधीचे मुख्यमंत्री...'

Yuvasena state level meet : ठाण्याच्या रेमंड कंपनीच्या मैदानात युवासेना राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन; गायक व संगीतकार अवधूत गुप्तेंनी घेतली मुलाखत.
Published on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमधून फिरतात. त्यामुळे त्यांची काही लोकांना एलर्जी होत आहे. पण, मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते म्हणून हेलिकॉप्टर प्रवासावरुन त्यांच्यावर टीका होत नव्हती, असे म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. आधी काही लोक गाडी स्वतः चालवत पंढरपूरला जात होते पण, इतक्या वेळात किती फाईलवर सह्या झाल्या असत्या, अशी टीकाही त्यांनी केली.

ठाणे येथील रेमंड कंपनीच्या मैदानात शनिवारी सायंकाळी युवासेना राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून खासदार शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी गुवाहाटीला जाण्यापासून ते बालपणापर्यंत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 

Uddhav Thackeray, Shrikant Shinde
MLA Rajesh Tope News : शरद पवारांचे विश्वासू राजेश टोपे संशयाच्या भोवऱ्यात?

आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही स्वतःच्या पैशाने दावोसला गेलो, त्यांच्यासारखे सरकारच्या पैशाने गेलो नव्हतो आणि नातेवाईकांना नेले नव्हते, असा आरोपही त्यांनी केला. तर खिचडी आणि करोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आहेत आणि आणखी काही लोक जाणार आहेत. त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार असल्याचीही टीकाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा द्या, तुमच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे आव्हान दिले होते. त्यावरुन खासदार शिंदे म्हणाले, आव्हान कोण देतं आणि त्याला प्रतिसाद काय द्यायचा आपण ठरवायला हवं. हत्तीने आपली चाल चालत राहावी, मागे कोण काय बोलतो याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपली योग्यता काय? आपला संबंध काय? आपण बोलतो काय? शिंदे साहेब हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नव्हते अशी टीका त्यांनी यावेळी केली.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray, Shrikant Shinde
Ajit Pawar : ट्रेलर दाखवलाय! खासदार निवडून द्या, पिक्चर दाखवतो; अजितदादांचे मुळशीकरांना आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com