Navneet Rana, Uddhav thackeray  Sarkarnama
महाराष्ट्र

Navneet Rana News : 'उद्धव ठाकरेंना सत्ता गेल्यानंतर झाली रामाची आठवण'; नवनीत राणांचा घणाघाती हल्ला!

Hanuman Chalisa controversy News : उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकले. आयुष्यातील 14 दिवस मी केव्हाच विसरणार नाही.

Sachin Waghmare

Mumbai News : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना तेव्हाच हनुमान चालीसा वाचायला हवी होती. त्यामुळे ना आमदार फुटले असते, ना घर फुटले असते, ना पक्ष बरबाद झाला असता. सर्व बरबाद झाल्यावर त्यांना राम आठवला, अजून बरेच काही आठवायचे आहे, अशी जहरी टीका माजी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. अमरावतीमधील एका कार्यक्रमप्रसंगी त्यांनी टीका केली.

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, 'उद्धव ठाकरेंनी मला जेलमध्ये टाकले. आयुष्यातील 14 दिवस मी केव्हाच विसरणार नाही. 40 डिग्रीमध्ये मी जेलमध्ये होते. ते मी कधीच विसरणार नाही. आमची लढाई होती, ती आम्ही लढलो. पण जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना हनुमान चालीसा नको होती. जसे ते पदावरून खाली उतरले, पूर्ण पक्ष त्यांनी बरबाद करून टाकला, तेव्हा जाऊन हनुमानाचे नाव आणि हनुमान चालीसा वाचन त्यांनी केले. सर्व बरबाद झाल्यावर आता त्यांना राम आठवला आहे.'

राज्यसभेच्या खासदारकीबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "लोक नगरसेवकपदासाठी एवढं लोटांगण घालतात. नवनीत राणाचा स्वाभिमान इतका अटळ आहे की तिने राज्यसभेची संधी सोडून स्वाभिमान जपला. राज्यसभेला कधी दुसऱ्यांच्या दारी गेले नाही, त्याला ठोकर मारली. त्यामुळे मी माझ्या विचारांची पक्की आहे.'

काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेल्या टीकेला राणा यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी कधी शासकीय कार्यक्रमात मंचावर जात नसते. मी माजी खासदार झाल्यामुळे मनाला नेहमी वेदना होतात. पण त्यावर मी कधीही जास्त भाष्य करत नाही. विरोधकांना मी शुभेच्छा दिल्या आहे. परंतु, त्यांना शुभेच्छा दिल्या याचा अर्थ असा नाही की मी शांत बसले आहे. शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी छोडती नहीं हे लक्षात ठेवा.

महिलांबद्दल वक्तव्य करताना खासदार बळवंत वानखेडे आणि विरोधकांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, मी माझी मर्यादा कधीही विसरले नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणांच्या नेहमीच पाठीशी असतात. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास ते करतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT