Shivsena UBT News : तहान भागवल्याचे क्रेडिट उद्धव ठाकरेंना नाहीच; भाजपच्या महापौरांनी नाकारला अभिनंदनाचा ठराव, नगरसेवकांना काढले सभागृहाबाहेर

Municipal Corporation Clash News : या गोंधळामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. रशीद मामू यांना सभागृहाबाहेर काढत असताना त्यांची सुरक्षा रक्षकांसोबत झटापटही झाली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महापौर समीर राजूकर यांनी सुरूवातीलाच सर्वसाधारण सभेत ऐनवेळचे विषय घेतले जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. परंतु शुक्रवारी महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि महापौरांमध्ये खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव घ्या, अशी मागणी करत नगरसेवक सचिन खैरे, गणेश लोखंडे, रशीद मामू हे महापौरांच्या आसनासमोर जाऊन गोंधळ घालत होते.

रशीद मामू यांनी राजंदड पळवण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महापौरांनी नगर सचिवांना नियम 40 नूसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच सुरक्षा रक्षकांना बोलावत संबंधित नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढण्यास सांगीतले. या गोंधळामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. रशीद मामू यांना सभागृहाबाहेर काढत असताना त्यांची सुरक्षा रक्षकांसोबत झटापटही झाली.

Uddhav Thackeray
Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

महापौरांनी मात्र वेलमध्ये येऊन गोंधळ घालणे कदापी खपवून घेणार नाही, जागेवर जाऊन बसलात तर तुमचे ऐकून घेईल, नसता तुम्हाला सभागृहाबाहेर काढेन, अशी तंबी दिली. तरीही ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक ऐकत नसल्याने अखेर सुरक्षा रक्षकांनी या सर्वांना महापौरांच्या आदेशाने सभागृहाबाहेर काढले.

Uddhav Thackeray
Shivsena UBT News : 'सौदा केला, आम्हाला डांबून ठेवलं...', झेडपी सदस्याचा अंबादास दानवेंवर गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंच्या नावाने भाजपला घाम फुटतो का?

ठाकरेंच्या पक्षाचे नगरसेवक रशीद मामू यांनी भाजपावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाची त्यांना अॅलर्जी असल्याचा आरोप केला. या शहराला 1680 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणि तीन हजार कोटींचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. तुम्ही इतरांच्या अभिनंदनाचे ठराव घेऊन चमचेगिरी करता, मग उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव का घेतला नाही? ऐनवेळचे विषय घेणार नाही, असे महापौरांना जाहीर केले, मग अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव ऐनवेळी कसा आणला?

Uddhav Thackeray
Maharashtra Budget Session: बिनखात्याचा मंत्री राहीन पण पुन्हा तो विभाग घेणार नाही; आशिष शेलार नेमके असे का म्हणाले?

आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर झाला, या विषयावर चर्चा करण्याची मागणी आम्ही केली तर महापौर म्हणतात तो विषय अजेंड्यावर आणा, अशा प्रकारे भाजपची दडपशाही सुरू आहे, असा आरोप रशीद मामू यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले की भाजपला (BJP) घाम फुटतो? असेही ते म्हणाले. गणेश लोखंडे यांनी महापौर दडपशाही करत आहेत. उद्धव ठाकरे यांना श्रेय द्यायचे नाही म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहाबाहेर काढले, असा आरोप केला.

Uddhav Thackeray
Shivsena Leader Meeting : एकनाथ शिंदेंनी निश्चित केलेली राज्यसभेची उमेदवारी शेवटच्या क्षणी गेली; फडणवीसांची जवळीक भोवली?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com