MLA Election NCP Candidate; sunil tatkare sarkarnama
महाराष्ट्र

Vidhan Parishad NCP Candidate : विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का! राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? तटकरेंचे महत्त्वाचे संकेत

sunil tatkare hints ncp mlc election candidate : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

Aslam Shanedivan

  1. सुनील तटकरे यांनी विधान परिषद उमेदवाराची घोषणा लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

  2. महायुतीतील जागावाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

  3. अनिकेत तटकरे यांनी आपल्या उमेदवारीच्या चर्चांना निराधार ठरवत अफवांना पूर्णविराम दिला आहे.

maharashtra legislative council election 2026 : राज्यात होणार्‍या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन जागांपैकी एक नाव फायनल असून दुसरे नाव अद्याप उघड झालेले नाही. तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हे समोर आले नव्हते. एकीकडे ७० ते ७५ जण इच्छुक असताना एका नावाची घोषणा केली जाईल असे संकेत दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. (MLA Election NCP Candidate)

राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तर २ मे रोजी मतदान होणार असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. १० जागांपैकी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ६ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला २, राष्ट्रवादीला १ आणि १ जागा महाविकास आघाडीला गेली आहे.

भाजपच्या यादीत विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव आणि सुनील कर्जतकर यांची नावे आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे फिक्स आहेत. तर दुसरे नाव अद्याप समोर आलेले नाही. तर राष्ट्रवादी कोणाला संधी देणार याकडे महायुतीचे लक्ष लागले आहे.

अशातच आता तटकरे यांनी उमेदवारीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. त्यांनी, पक्षांतर्गत चर्चा पूर्ण झाली असून, उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच (संध्याकाळपर्यंत) केली जाईल, असे तटकरेंनी स्पष्ट केले आहे. महायुतीतील जागावाटप आणि पक्षात ७५ हून अधिक इच्छूक असल्याने अंतिम निवडीसाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. उमेदवारीचे निकष: ज्यांनी पक्षात योगदान दिले आहे, अशा निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असे संकेत सुनील तटकरेंनी दिले आहेत.

यावेळी तटकरे म्हणाले की, पक्षाच्या वाट्याला एक जागा आली असून ७० ते ७५ अर्ज आणि निवेदन आले होते. यावर पक्षाच्या कोअर कमिटीने सारासार विचार केला आहे. आता त्या संदर्भामध्ये आज बुधवार (ता.२९) संध्याकाळपर्यंत पक्षाकडून अधिकृत नावाची घोषणा निश्चितपणे केली जाईल. तर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत अर्ज भरला जाईल. पक्षाकडून अधिकृत नावाची घोषणा करताना प्रादेशिक समतोलाचा विचार करण्यात आला आहे. इतरही जी काही समीकरण असतात त्याचा विचार करत पक्ष मजबुतीच्या अनुषंगाने निर्णय घेऊ.

पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अद्याप कोणत्याही नावावर एकमत झालेलं नाही अशी माहिती मिळत आहे. तर अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांनीच घ्यावा असे पक्षातील नेत्यांनी त्यांना विनंती केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद उमेदवाराचे नाव जाहीर करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. पण माजी आमदार अनिकेत तटकरे यांनीच समोर येऊन याबाबत मोठा खुलासा केला. त्यांनी आपण विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छूक नाही. तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही सांगितले होते.

FAQs :

1. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार कधी जाहीर करणार आहे?
सुनील तटकरे यांच्या म्हणण्यानुसार उमेदवाराची घोषणा लवकरच, कदाचित संध्याकाळपर्यंत होऊ शकते.

2. महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार आहे?
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाल्याची चर्चा आहे.

3. उमेदवार निवडीचे निकष काय आहेत?
पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल.

4. अनिकेत तटकरे उमेदवारी इच्छुक आहेत का?
नाही, त्यांनी या चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

5. मतदान कधी होणार आहे?
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT