

Sushma Andhare : विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांमध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी ठाकरेच्या शिवसेनेतील सुषमा अंधारे यांचे नाव चर्चेत होते. सुषमा अंधारे या उमेदवारीसाठी रश्मी ठाकरे यांच्या मार्फेत प्रयत्न करत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, यावर अंधारे यांनी स्वतःच मोठा खुलासा केला आहे.
त्यांनी फेसबक पोस्ट करत म्हटले आहे की, 'शिवसेनेची एक पक्ष शिस्त आहे. नेतृत्व जी गोष्ट ठरवत असतं ती एकदा आदेशित झाल्यानंतर माझ्यासारख्या काम करणाऱ्या छोट्यातल्या छोट्या शिवसैनिकांनी त्यावर फक्त आणि फक्त अमल करायचा असतो.'
'विधान परिषदेच्या संबंधाने ज्या बातम्या आज आल्या त्या मला अचंबित करणाऱ्या आहेत. मी सहा तारखेला ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट झाले. 12 तारखेला माझा डिस्चार्ज झाला. त्यानंतर मी माझ्या गावी परळीत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत मी मातोश्री किंवा सेना भवन इकडे फिरकलेले नाही. कुणाची जागा कुठे आहे हे नेतृत्व उत्तम प्रकारे जाणते आणि नेतृत्व जो काही निर्णय घेते तो निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य आहे.', असे त्यांनी म्हटले आहे.
'पक्षातल्या कुणाशीही माझे कुठल्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. बातम्या लावणाऱ्या पत्रकारांना विनंती आहे कृपया माझा संपूर्ण फोन चेक करा त्यातले नंबर चेक करा हवे तर त्याचे सीडीआर काढा. माझं कुणाशीही एकही शब्दाचं बोलणं झालेलं नाही. कृपया टेबल न्यूज पेरणे बंद करा.', असे अंधारे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याची बोलले जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे, वैभव नाईक, सुरज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काँग्रेसने विधान परिषदेवर पुन्हा उद्धव ठाकरेनीच जावे, अशी भूमिका घेतली आहे. ठाकरे असतील तर आपण सकारात्मक भूमिका घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.