MLC BJP Candidate : भाजपात मोठ्या घडामोडी, विधान परिषदेची 'या' महिला नेत्याला उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांकडून हिरवा कंदील!

Legislative Council Elections BJP : भाजपकडून सहा जागांसाठी जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये दोन महिलांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, एका महिलेची नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याची माहिती आहे.
devendra fadnavis
devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातील 9 जागा या उमदेवारांची मुदत संपल्याने होत आहे. तर, एका जागेवर पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

भाजपच्या वाट्याला या दहा जागांपैकी 6 जागा येणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत मोठी स्पर्धा असल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र, सहापैकी पाच जागांवर उमेदवार असून निश्चित झाला नसताना सहाव्या जागेवर मात्र महिला उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

काँग्रेसमध्ये असलेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

'वर्षा'वर आज बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर आज भाजपची बैठक होत आहे. या बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पक्षसंघटनेत काम करणाऱ्या संघाची पार्श्वभूमी असलेल्या एका वरिष्ठ नेत्याला संधी मिळणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रवक्तेपदावर असलेला एक नेता देखील विधान परिषदेसाठी इच्छुक असून त्याच्या नावावर देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

devendra fadnavis
Legislative Council Election : देवेंद्र फडणवीसांचे धक्कातंत्र, मोहिते पाटील, केचेंचा पत्ता कट? विधान परिषदसाठी 'या' नेत्यांची नावे चर्चेत!

'ही' 12 नावे चर्चेत

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, माधवी नाईक, राजेश पांडे, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी, दयाशंकर तिवारी आणि संजय काका पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपकडून धक्कातंत्र वापरत नवीन नावांना पसंती दिली जाऊ शकते.

devendra fadnavis
MLC Election : सुनेत्रा पवारांचे 'धक्कातंत्र', विधान परिषदेत माजी आमदाराला संधी? पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ताकद वाढवण्यासाठी रणनीती...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com