ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Video Ajit Pawar : अजितदादांचे विधान परिषदेचे उमेदवार ठरले! उमेदवारी अर्ज...

Roshan More

Ajit Pawar : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून हेच दोन उमेदवार असतील असे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत. तर, राजेश विटेकर यांना लोकसभेला माघार घेताना विधान परिषदेवर संधी देऊ असा अजित पवार यांच्याकडून शब्द दिला होता. उद्या दोन्हीं उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 9 तर, महाविकास आघाडीचे MVA दोन उमेदवार विजयी होतील, असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याकडे नेत्यांचे लक्ष्य लागले आहे.

आजच उमेदवारी निश्चित होणार

मंगळवारी (ता.2) विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे पक्षांना आजच (सोमवारी) आपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. भाजपने BJP आपल्या दहा उमेदवारांची नावे केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याची माहिती आहे.

दानवे, पंकजा मुंडेंना उमेदवारी?

केंद्रीय नेतृत्वाला पाठवलेल्या यादीत लोकसभे निवडणुकीत पराभूत झालेले रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीत सामाजिक समीकरणांसाठी या दोघांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT