The Nationalist Congress Party has reportedly transferred key financial powers to Sunetra Pawar, Jay Pawar and Parth Pawar, in a move seen as a setback for Praful Patel. Sarkarnama
महाराष्ट्र

Sunetra Pawar Politics : सुनेत्रा पवारांनी सुत्रं फिरवली, एका निर्णयाने जय-पार्थ पवारांना ताकद, पक्षाच्या आर्थिक व्यवहार…

Sunetra Pawar strengthens Jay Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. यादीमुळे प्रफुल पटेल यांना मोठा धक्का देण्यात आला असून पक्षाचे आर्थिक व्यवहार पवार कुटुंबीयाकडे राहणार असल्याचे दिसते आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP financial affairs latest update: राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन पदाधिकाऱ्यांची यादी निवडणुक आयोगाकडे सुपुर्द करण्यात आली होती. या यादीमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाने जय आणि पार्थ पवार यांची ताकद वाढली आहे. या यादीनुसार पक्षाचे आर्थिक व्यवहारांचे पूर्ण अधिकार सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे असणार आहे. या विषयीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

पक्षाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्वी प्रफुल्ल यांना महत्वाचे अधिकार होते. मात्र. नवीन यादीनुसार त्यांना या प्रक्रियेतून बाजुला सारल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पटेलांना या प्रक्रियेतून बाजूला सारत पवार कुटुंबाची पकड मजबूत केल्याची चर्चा आहे.

खजिनदारपद हे शिवाजीराव गर्जे यांच्याकडे असले तरी त्यांच्याकडे लेखापरीक्षणाचे काम असणार आहे. तर, खजिनदाराची पूर्ण जबाबदारी जय पवार यांच्याकडे असणार आहे. यापूर्वी अजित पवार हयात असताा पक्षाचे आर्थिक व्यवहार हे त्यांच्या आणि राष्ट्रीय महासचिव प्रफुल पटेल यांच्या स्वाक्षरीने व्यवहार होत होते. मात्र, महासचिव पार्थ पवार असणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार हे आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या स्वाक्षरीनेच होणार आहेत, असे 'साम'च्या वृत्तात म्हटले आहे.

प्रफुल पटेलांचे पंख छाटले?

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे आहेत. तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल , सुनील तटकरे यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नाही.

त्यामुळे प्रफुल पटेल यांचे पंख छाटल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, या विषयीचे वृत्त समोर आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत 'माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल' असं म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT