TET Compulsory For Promotion: ZP शिक्षकांना मोठा धक्का! TET शिवाय पदोन्नती नाही; हायकोर्टाने स्पष्टच सांगितलं

ZP Teachers Promotion News: टीईटी पात्रता नसलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांना पदोन्नती मिळणार नाही, असा स्पष्ट निर्णय हायकोर्टाने दिला आहे. राज्यातील हजारो शिक्षकांवर या निकालाचा परिणाम होणार आहे.
ZP Teachers Promotion News
ZP Teachers Promotion NewsSarkarnama
Published on
Updated on

धाराशिव : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भातील महत्त्वाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा हक्क मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने 23 शिक्षकांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 3 एप्रिल 2025 रोजी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक या पदांसाठी पदोन्नतीची यादी जाहीर केली होती. या यादीत टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच प्राधान्य देण्यात आले होते. टीईटी पात्रता नसलेल्या काही शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यानंतर 23 शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अनेक वर्षे सेवा बजावली असून पदोन्नतीसाठी आवश्यक अनुभव आणि इतर अटी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे केवळ टीईटी नसल्याच्या कारणावरून पदोन्नती नाकारणे अन्यायकारक आहे. तसेच, टीईटी ही नियुक्तीसाठीची अट असू शकते; मात्र पदोन्नतीसाठी ती सक्तीची करू नये, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

मात्र न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयाचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. 'राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) आणि संबंधित नियमांनुसार टीईटी पात्रता ही गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांची गुणवत्ता निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे टीईटी ही केवळ नियुक्तीसाठीच नव्हे, तर पदोन्नतीसाठीही महत्त्वाची अट मानली जाऊ शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ZP Teachers Promotion News
Maharashtra Teacher News: समान काम, समान वेतन! उच्च न्यायालयाचा विषय शिक्षकांना मोठा दिलासा

शिक्षकांकडे अनुभव असला तरी शैक्षणिक पात्रतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पदोन्नती ही हक्काची बाब नसून, शासनाने ठरवलेल्या निकषांनुसारच ती दिली जाऊ शकते. त्यामुळे शिक्षण विभागाने तयार केलेली पदोन्नती यादी योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.या निर्णयामुळे आता राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेत टीईटी पात्रतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याचे मानले जात आहे.

ZP Teachers Promotion News
Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ, 1 जानेवारीपासूनचा फरक मिळणार, सोप्या भाषेत समजून घ्या!

महत्त्वाचे मुद्दे :

  • टीईटी उत्तीर्ण नसल्यास पदोन्नती मिळणार नाही

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय

  • जिल्हा परिषद शिक्षकांची याचिका फेटाळली

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत निकाल

  • 3 एप्रिल 2025 च्या पदोन्नती यादीवरून वाद

  • शिक्षण विभागाला पदोन्नती प्रक्रियेत स्पष्टता मिळाली

  • 23 शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com