NCP Executive List : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारणीच्या यादीत पक्षातील अनेक दिग्गजांची नावे वगळल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे या यादीत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांची नावे आहेत. तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नाव वगळल्याचं दिसत आहे.
ही यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या राष्ट्रीय कार्यकारणीच्या यादीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या यादीमध्ये काही तांत्रिक चुका असून त्या दुरुस्त केल्या जातील त्यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवार यांनी या यादी संदर्भात एक्स एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 'माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल' असं म्हटलं आहे. मात्र, पक्षातील दिग्गज आणि वरिष्ठ नेत्यांची नावेच पदाधिकाऱ्यांच्या यादीत नसल्यामुळे पक्षात काही अंतर्गत वाद आहे का? अशा चर्चांना उधाण आलं होतं.
यावरही सुनेत्रा पवारांनी स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या, "सुधारित यादी लवकरच निवडणूक आयोगाकडे सोपवली जाईल. प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून किंवा पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं नाही. पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नाही." त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाच्या यादीवरून सुरू असलेल्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.