Ajit Pawar, Aditi Tatkare Sarkarnama
महाराष्ट्र

Aditi Tatkare : कोकणातील आदिती तटकरे यांच्यावर विदर्भात मोठी जबाबदारी?

Gondia Guardian Minister Dharmarao Baba Atram Aditi Tatkare NCP : धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदियाचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आदिती तटकरे यांचे नाव चर्चेत आले आहे.

Rajanand More

Gondia Guardian Minister : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते तयारी लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनीही त्यासाठी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची जागा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे घेण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात अपेक्षित यश मिळाले नाही. भंडारा-गोंदियामध्येही महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विद्यमान आमदारांमध्येही विधानसभा निवडणुकीबाबत चिंता वाढली आहे.

शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पालकमंत्री पदाचा भार हलका करण्यास संगितले होते. त्यानंतर आत्राम यांनीही पालकमंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आत्राम यांच्याजागी मंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप पक्षातील नेत्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली आणि चंद्रपूरकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तिथून पक्षाला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे आत्रामांनी पालकमंत्री पदापासून दूर राहण्याची तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT