Devendra Fadnavis On Reservation : फडणवीसांची आरक्षणाबाबत मोठी भूमिका; राज्य सरकार निर्णय, असा घेणार...

Devendra Fadnavis presented the government position on reservation : ओबीसी आणि मराठा आरक्षणावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीत ओबीसी आंदोलकांची भूमिका समजावून घेऊन, त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Devendra Fadnavis On Reservation
Devendra Fadnavis On ReservationSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : ओबीसी, मराठा आरक्षण आणि त्यावरून राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. लक्ष्मण हाके आणि त्यांच्याबरोबरच्या आंदोलकांनी लेखी आश्वासनावर ठाम भूमिका घेत बेमुदत उपोषण सुरूच ठेवलं आहे.

"दोन्ही समाजाचे सरकार अहित पाहाणार नाही. आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवायचा आहे. राज्य सरकारचे तसे प्रयत्न सुरू आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसा आंदोलनाच्या आक्रमकपणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत ओबीसी आंदोलक यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. तिथे ओबीसी आणि मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होईल. ओबीसी आंदोलकांच्या मागण्या सविस्तरपणे जाणून घेतल्या जातील. यात कोणाचेही नुकसान होणार नाही अशीच भूमिका सरकारची राहणार आहे.

Devendra Fadnavis On Reservation
Eknath Khadse : खडसेंनी शाह भेटींचं गुपित सांगितलं; भाजप प्रवेशावर मोठं विधान

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या बैठकीवर भाष्य करताना म्हणाले, "आमचा पहिला प्रयत्न असा आहे की, दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये. दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे राहू नये. दोन्ही समाजाचे अहित होऊ नये, हीच आमची भूमिका आहे. एखाद्या समाजाला वाटत असेल, तर सरकार आमचं अहित करणार आहे. तसे होणार नाही. सरकार कोणाचेच अहित करणार नाही. आमची कुठेलही मानसिकता नाही". आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे आहे. सगळे प्रश्न सोडवायचे आहे. कायद्याच्या चौकटीत हे प्रश्न सोडवायचे आहेत. तसेच प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis On Reservation
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आयोगानं कंबर कसली...

दरम्यान, ओबीसी आंदोलनाची तीव्रता राज्यात वाढू लागली आहे. नांदेड, रत्नागिरी, बीड, नाशिक इथं आंदोलन पेटलं आहे. ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. बीडमधील आंदोलकांशी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी फोनवरून संपर्क साधून चर्चा केली. ओबीसी आरक्षणासाठी आपण न्यायालयात जाऊन लढणार आहोत, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी यावेळी मांडली. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे आंदोलन जालना इथंच सुरू आहे. अंतरवाली सराटीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वडीगोद्री इथं आंदोलन सुरू आहे. ओबीसींच्या या आंदोलनाला अंतरवाली सराटी येथून देखील पाठिंबा मिळू लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com