Solapur, 21 June : काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयावर केलेला हल्ला हा खासदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून केला आहे, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला आहे.
सोलापुरातील (Solapur) शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांच्या कार्यालयात गाडी घुसवत धुडगूस घातल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली होती. त्या प्रकरण सदर बझार पोलिस ठाण्यात काँग्रेसच्या (Congress) अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख यांच्यासह त्यांचे सहकारी सादिक शेख आणि मोहसीन शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख काळजे यांच्या कार्यालयात गाडी घुसवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा धुडगूस काँग्रेस पदाधिकारी सोहेल शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घातला आहे, असा आरोप काळजे यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, नव्याने खासदार झालेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या अशा घटनांच्या माध्यमातून सोलापूरमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे शहर सरचिटणीस सोहेल शेख याने प्रणिती शिंदेंच्या सांगण्यावरून माझ्या सात रस्ता परिसरातील शिवसेना भवनात गाडी घुसवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला
काही दिवसांपूर्वी सोहेल शेख यांच्या अनधिकृत हॉटेलच्या विरोधात मी तक्रार केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई करत ते हॉटेल काढून टाकले हेते. त्याचा राग मनात धरून सोहेल शेख याने शिवसेना कार्यालयात गाडी घुसवत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, असा आाेप मनीष काळजे यांनी केला.
माझ्या कार्यालयावर झालेला हल्ला हा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी करायला लावला आहे. त्याचबरोबर संबंधित संशयित आरोपीने महिला पोलिस कर्मचारी आणि पोलिसांना देखील धक्काबुक्की केली आहे, असे मनीष काळजे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना कार्यालयावर हल्ला करणारे सोहेल शेख यांच्यासह त्यांचे सहकारी सादिक शेख आणि मोहसीन शेख यांच्याविरोधात मनीष काळजे यांनी पालिसांत तक्रार दिली होती, त्यानुसार सोहेल शेख यांच्याह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.