Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil News : "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच...''; जयंत पाटलांच्या दाव्यानं आघाडीचं टेन्शन वाढवलं

Maharashtra Politics: '' महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल...''

सरकारनामा ब्यूरो

Karad News : महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसागणिक अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. मुख्यमंत्रीपदावर रोज नवीन दावेदारी पाहायला मिळत आहेत. त्यातच राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नेतेमंडळींच्या मुख्यमंत्रीपदावरील विधानांमुळे आघाडीतील मतभेद लपून राहिलेले नाही. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान करत महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar), भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे एकीकडे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) कराड येथील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाविषयी मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याचं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

"महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी(NCP)चा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही.

अजितदादा आणि माझ्यात...

तसेच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी विधानं जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमतानं चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं ते वक्तव्य प्रतीक पाटील आणि माझ्या कौतुकासाठी होतं. मात्र, उद्देश काही नाही. अजितदादा आणि माझ्यात किंवा पक्षात कोणाशीही स्पर्धा नाही. पोस्टरबाजी आणि मागणी ही कार्यकर्त्यांच्या भावना आणि अमोल कोल्हे यांचे केवळ मत इथंपर्यंतच या गोष्टी मर्यादित आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT